शिंगणापूर निवासी शाळा विकासासाठी आराखडा - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जानेवारी 2018

कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या शिंगणापूर (ता. करवीर) येथील निवासी क्रीडा शाळेच्या विकासासाठी सर्वसामावेशक आराखडा तयार केला जाईल. याचा समयबद्ध कार्यक्रम राबविला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या शिंगणापूर (ता. करवीर) येथील निवासी क्रीडा शाळेच्या विकासासाठी सर्वसामावेशक आराखडा तयार केला जाईल. याचा समयबद्ध कार्यक्रम राबविला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

येथील पोलिस कवायत मैदानावर जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्‌घाटन मंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. 

मंत्री पाटील म्हणाले की, शिंगणापूर येथील निवासी क्रीडा प्रशालेची पाहणी केली जाईल. तेथे असणाऱ्या अडचणी जाणून घेऊन त्यावर उपाययोजना व सर्वसमावेशक आराखडा निश्‍चित केला जाईल. जिल्हा परिषदेकडील विविध विभागांत अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून प्रशासकीय कामकाज अधिक तत्परतेने आणि लोकाभिमुख झाले पाहिजे. अधिकारी-कर्मचाऱ्यांचे आरोग्यही तंदुरुस्त असणे गरजेचे आहे, यासाठीच अशा क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा उपयुक्त ठरतील, असा विश्‍वास श्री. पाटील यांनी व्यक्त केला. अधिकारी, कर्मचाऱ्यांचा कामाचा ताण अशा स्पर्धांच्या माध्यमातून कमी करून प्रशासकीय कामे अधिक गतीने आणि लोकाभिमुख होतील. या क्रीडा स्पर्धा खेळीमेळीत पार पडाव्यात, यासाठी सर्वांनी खिलाडू वृत्तीने या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

९४१ स्पर्धक सहभागी
तीन दिवसांच्या स्पर्धेत ९४१ स्पर्धक सहभागी आहेत. ६८२ पुरुष, तर २५९ महिला खेळाडूंचा समावेश आहे. या स्पर्धा सांघिक व वैयक्तिक अशा १२ खेळ क्रीडा प्रकारात खेळविल्या जाणार आहेत. सांघिक खेळ प्रकारात क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, धावणे हे खेळ आहेत. वैयक्तिक खेळ प्रकारात धावणे, बॅडमिंटन, टेबल टेनिस, थाळीफेक, गोळाफेक या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांचे सातत्याने आयोजन केले जाते. तीन दिवसांच्या स्पर्धेत ९४१ स्पर्धक सहभागी आहेत. ६८२ पुरुष, तर २५९ महिला खेळाडूंचा समावेश आहे. या स्पर्धा सांघिक व वैयक्तिक अशा १२ खेळ क्रीडा प्रकारात खेळविल्या जाणार आहेत. सांघिक खेळ प्रकारात क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, धावणे हे खेळ आहेत. वैयक्तिक खेळ प्रकारात धावणे, बॅडमिंटन, टेबल टेनिस, थाळीफेक, गोळाफेक या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. 

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, संजय लोढे, शिक्षण सभापती अंबरिशसिंह घाटगे, बांधकाम सभापती सर्जेराव पाटील-पेरीडकर, समाजकल्याण सभापती विशांत महापुरे, महिला व बालकल्याण सभापती शुभांगी शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, डॉ. हरीश जगताप, राजेंद्र भालेराव, चंद्रकांत सूर्यवंशी, संजय राजमाने, सोमनाथ रसाळ, सुषमा देसाई, डॉ. प्रकाश पाटील, शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले, किरण लोहार, एस. एस. शिंदे, तुषार बुरूड उपस्थित होते. 

Web Title: Kolhapur News Chandrakant Patil comment