संप मिटल्यामुळे काहींची दुकाने बंद: चंद्रकांत पाटील

वृत्तसंस्था
रविवार, 4 जून 2017

शेतकऱ्यांना हमीभाव द्यायला शरद पवार यांचे हात बांधले होते का? शेतकऱ्यांचा राजा ही पदवी जाईल, याची पवारांना भिती आहे. संप बंद झाल्यामुळे काहींची दुकाने 2 दिवसांत बंद झाली. यावेळी लूट करणारे कोणत्या पक्षाचे हे तपासा.

कोल्हापूर - शेतकऱ्यांचा संप दोन दिवसांत मिटल्यामुळे काहींची दुकाने बंद झाली. या दोन दिवसांत लूट करणारे कोणत्या पक्षाचे होते हे तपासा, असे म्हणत सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांवर टीका केली.

शेतकऱ्यांच्या एका गटासोबत चर्चा करून सरकारने 70 टक्के मागण्या पूर्ण करत संप मिटल्याचे जाहीर केले होते. मात्र, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी संप सुरुच असल्याचे जाहीर केले होते. शेतकऱ्यांनी सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. संपाविषयी चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, की शेतकऱ्यांना हमीभाव द्यायला शरद पवार यांचे हात बांधले होते का? शेतकऱ्यांचा राजा ही पदवी जाईल, याची पवारांना भिती आहे. संप बंद झाल्यामुळे काहींची दुकाने 2 दिवसांत बंद झाली. यावेळी लूट करणारे कोणत्या पक्षाचे हे तपासा. तथाकथित नेत्यांना आणि विरोधकांना संप मिटल्याचे दुःख आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांना सुख देणे ही संपात फूट कशी? शेतकरी दूध, फळे वाया कसे घालवेल?

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा -
लंडनमध्ये तीन ठिकाणी दहशतवादी हल्ले; 7 ठार
सांगली, कोल्हापूरला भूकंपाचा सौम्य धक्का​
नाशिकमध्ये शेतमालासाठी 'सुरक्षित कॉरिडॉर'​
'''महाराष्ट्र बंद' उद्या होणारच; संप मिटलेला नाही''​
'आश्‍वासने न पाळल्याने तावडेंनी राजीनामा द्यावा'​

Web Title: kolhapur news Chandrakant Patil talks about farmer strike