जि.प.च्या ३७९ शाळा खोल्या धोकादायक - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या शाळांमधील ३७९ खोल्या धोकादायक असून, १३४ खोल्या नव्याने बांधाव्या लागणार आहेत. यासाठी १८ कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल  दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात काल  झालेल्या नियोजन समिती बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

महसूलमंत्री पाटील म्हणाले, ‘‘जिल्ह्यात ५१३ नवीन शाळा खोल्यांची आवश्‍यकता आहे. त्यासाठी सुमारे ३७ कोटींचा निधी आवश्‍यक आहे. ९८१ शाळा खोल्यांच्या दुरुस्तीसाठी ९ कोटी ८१ लाख निधी आवश्‍यक आहे, तर १६१ शाळांना सरक्षक भिंतीसाठी ९ कोटींची आवश्‍यकता आहे. यामध्ये शाळा खोल्या दुरुस्ती व संरक्षक भिंतीसाठी याचवर्षी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून दिला जाईल. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी या शाळांच्या खोल्यांचे ऑनलाईन सर्वेक्षण केले आहे. यामध्ये सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे जिल्ह्यातील या सर्व शाळा सक्षम करण्याकडे लक्ष दिले जाईल. तसेच जिल्ह्यात १६० तलाठी कार्यालयांची आवश्‍यकता आहे. यापैकी ५० तलाठी कार्यालये अद्ययावत उभारण्यात येतील, असेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

दृष्टिक्षेपात
 ९८१ वर्ग खोल्यांची दुरुस्ती - ९ कोटी
 १६१ शाळांना संरक्षण भिंत - ९ कोटी
 ३७९ वर्ग खोल्या धोकादायक
 १३४ वर्ग खोल्या नव्याने बांधण्याची मागणी

Web Title: kolhapur news chandrakant patil zp school