ॲपवरून करा आता नावात बदल....महावितरणकडून नवी सुविधा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 मार्च 2018

कोल्हापूर - महावितरण वीज मीटर जोडणी ज्या मालकांच्या नावे आहे, त्या नावात काही बदल करून घ्यायचा असल्यास किंवा घर बदलले आहे, वीज मीटरच्या जोडणीचे नाव बदलायचे आहे, त्यासाठी महावितरणच्या कार्यालयात हेलपाटे न मारता थेट महावितरणच्या ॲपवरून नाव बदल करून घेता येणार आहे, त्यामुळे वीज ग्राहकांचा श्रम, वेळ व पैशांची बचत होणार आहे.

कोल्हापूर - महावितरण वीज मीटर जोडणी ज्या मालकांच्या नावे आहे, त्या नावात काही बदल करून घ्यायचा असल्यास किंवा घर बदलले आहे, वीज मीटरच्या जोडणीचे नाव बदलायचे आहे, त्यासाठी महावितरणच्या कार्यालयात हेलपाटे न मारता थेट महावितरणच्या ॲपवरून नाव बदल करून घेता येणार आहे, त्यामुळे वीज ग्राहकांचा श्रम, वेळ व पैशांची बचत होणार आहे.

महावितरण ॲप सुविधा सुरू करून वीज ग्राहकांना झटपट सेवा देण्याचे विविध पर्याय महावितरणने उपलब्ध केले आहेत. त्यांपैकीच एक भाग असलेले ॲप वीज ग्राहकांना उपयुक्त ठरते आहे. 

महावितरणचे संचालक संजीव कुमार यांनी माहिती तंत्रज्ञान विभागाला दिलेल्या सूचनेनुसार हे सेवा मोबाईल ॲप ऑनलाईन उपलब्ध झाले. त्यासाठी ग्राहकांना गुगल प्ले स्टोअर, ॲपल स्टोअर, विंडोज व महावितरण संकेतस्थळावरून महावितरण कन्झ्युमर ॲप डाऊनलोड करून घ्यावे लागते. असे ॲप घेतले असेल तर ५.२० ही सुधारित आवृत्ती अद्ययावत करावी लागेल.

यात ॲपद्वारे नवीन वीज जोडणीसाठी अर्ज करणे, वीज बिल पाहणे, ऑनलाईन भरणे, तक्रारी पाठविणे, त्यांचा पाठपुरावा करणे, रीडिंग नोंदवणे, जुन्या बिलांचा इतिहास आदी सुविधा ॲपमध्ये आहेत. चालू महिन्यात आलेल्या ५.२० या अद्ययावत आवृत्तीमध्ये वीज जोडणीच्या नावात बदल करणे, त्यासाठी आवश्‍यक कागदपत्रे अपलोड करणे अशा सुविधा नव्याने समाविष्ट आहेत. महावितरणच्या कोल्हापूर परिमंडलात जवळपास अडीच लाख वीज ग्राहक आहेत. यांतील बहुतांश ग्राहक महावितरणचा मोबाईल ॲप वापरतात. अशा वीज ग्राहकांना याचा उपयोग होईल. 

नावात बदल करण्यासाठी पद्धत अशी
महावितरण ॲपच्या डाव्या कोपऱ्यात मेन्यू दिला आहे. त्यात बरेच पर्याय दिले आहेत. त्यांपैकी नावात बदलाची मागणी हा पर्याय निवडावा. नाव बदलण्यासाठी ग्राहक क्रमांक निवडल्यास ‘प्रपत्र उ’ येते. तिथे बदल करावयाची माहिती भरावी. त्यानंतर बदलांचे कारण निवडून अटी मान्य कराव्यात व पुढे जाऊन मिळकतीचा पुरावा व फार्म एक्‍सचा फोटो काढून अपलोड करावा. माहिती अपलोड होताच त्याचा नोंदणी क्रमांक आपल्याला मिळेल.

Web Title: Kolhapur News change meter owner name through app