शिवछत्रपती पुरस्कारांची घोषणा - कोल्हापूरातील 23 जणांचा समावेश

संदीप खांडेकर
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर -  तीन वर्षे रखडलेल्या शिवछत्रपती पुरस्कारांची घोषणा होऊन कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल तेवीस जण या पुरस्काराचे मानकरी ठरले.

कोल्हापूर -  तीन वर्षे रखडलेल्या शिवछत्रपती पुरस्कारांची घोषणा होऊन कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल तेवीस जण या पुरस्काराचे मानकरी ठरले.

बिभीषण पाटील यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे. प्रीती व विक्रम इंगळे या बहिण-भावाला स्केटिंग खेळाडू म्हणून, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेमबाज घडविणारे प्रशिक्षक अजित पाटील यांना क्रीडा मार्गदर्शक व ज्येष्ठ कुस्तीपटू संभाजी लहू वरूटे यांना संघटक कार्यकर्ता पुरस्कार मिळाला आहे.

आंतरराष्ट्रीय बुद्धीबळपटू ऋचा पुजारी, एकलव्य दिव्यांग खेळाडू अनिल पवार, नलिनी डवर, अभिषेक जाधव, शुक्‍ला बीडकर यांना एकलव्य दिव्यांग खेळाडू म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्काराची घोषणा होताच खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, संघटक कार्यकर्ता यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. जिल्हा क्रीडा कार्यालयात पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. 

* 2014-15 
- अजित पाटील (क्रीडा मार्गदर्शक) - नेमबाजी 
- चंद्रकांत चव्हाण (क्रीडा मार्गदर्शक) - कुस्ती
- प्रदीप पाटील (क्रीडा मार्गदर्शक) - वेटलिफ्टिंग
- मंदार दिवसे (खेळाडू) - जलतरण 
- विजय मोरे (खेळाडू) - शरीसौष्ठव
- ओंकार ओतारी (खेळाडू) - वेटलिफ्टिंग
- गणेश माळी (खेळाडू) - वेटलिफ्टिंग
- अनिल पवार (एकलव्य दिव्यांग खेळाडू) - मैदानी, व्हॉलीबॉल, धनुर्विद्या
- नलिनी डवर (एकलव्य दिव्यांग खेळाडू) - मैदानी

* 2015-16
- संभाजी लहू वरूटे (संघटक कार्यकर्ता) 
- सचिन पाटील (खेळाडू) - मैदानी
- विक्रम इंगळे (खेळाडू) - स्केटिंग
- रोहित हवालदार (खेळाडू) - जलतरण
- अजिंक्‍य रेडेकर (खेळाडू) - शरीरसौष्ठव
- कौतुक डाफळे (खेळाडू) - कुस्ती

* 2016-17
- स्वप्नील कुसाळे (खेळाडू) - नेमबाजी
- ऋचा पुजारी (खेळाडू) - बुद्दीबळ
- प्रिती इंगळे (खेळाडू) - स्केटिंग
- विक्रम कुऱ्हाडे (खेळाडू) - कुस्ती
- अमित निंबाळकर (खेळाडू) - पॉवरलिफ्टिंग
- अभिषेक जाधव (एकलव्य दिव्यांग खेळाडू) - जलतरण
- शुक्‍ला बीडकर (एकलव्य दिव्यांग खेळाडू) - मैदानी
- बिभीषण पाटील (जीवनगौरव) 
 

Web Title: Kolhapur News Chhatrapati awards decleared