कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव

संभाजी थोरात
बुधवार, 17 जानेवारी 2018

कोल्हापूर - येथील विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्याचा निर्णय आज झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये घेण्यात आला. या निर्णयाचे स्वागत भाजपच्या वतीने करण्यात आले.

कोल्हापूर - येथील विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्याचा निर्णय आज झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये घेण्यात आला. या निर्णयाचे स्वागत भाजपच्या वतीने करण्यात आले.

व्हीनस कॉर्नर येथील छत्रपती राजाराम महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून भाजपच्यावतीने साखर पेढे वाटत आंनद व्यक्त करण्यात आला. कोल्हापुरात राजाराम महाराजांनी विमान सेवा सुरू केली होती. त्या अनुषंगाने कोल्हापूरच्या विमानतळाला राजाराम महाराज यांचे नाव देण्याची मागणी अनेक वर्षापासून सुरु होती. त्या मागणीला आता मूर्त स्वरूप आल्याने कोल्हापूरकरांच्या मध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Web Title: Kolhapur News Chhatrapati Rajaram Maharaj Airport

टॅग्स