मुख्यमंत्री फडणवीस यांचे कोल्हापूर विमानतळावर स्वागत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कोल्हापूर विमानतळावर दुपारी साडेतीन वाजता आगमन झाले. यावेळी त्यांचे विमानतळावर उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले. त्यांच्या समवेत महसूल मंत्री चंद्रकांत पाटीलही होते.

कोल्हापूरच्या महापौर हसिना फरास यांनी मुख्यमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.  यावेळी आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक, यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष हिंदूराव शेळके, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरे - पाटील,  पोलीस अधीक्षक संजय मोहिते, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, करवीरचे उप विभागीय अधिकारी सचिन इथापे, करवीरचे तहसिलदार उत्तम दिघे, गोकुळेचे संचालक बाबा देसाई उपस्थित होते.

Web Title: Kolhapur News Chief Minister tour