मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचे काटेकोर नियोजन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 मे 2017

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर उद्या (ता. 29) येणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमांचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. लातूर येथे फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघाताच्या पार्श्‍वभूमीवर महसूल व पोलिस प्रशासनाने त्यांच्या दौऱ्यात प्रत्येक ठिकाणी "ब' रक्त गट असलेली रुग्णवाहिका, पुरेसा पोलिस बंदोबस्त, हेलिपॅडची सुस्थितीतील जागा व सर्व ठिकाणांची जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सोपवली आहे.

फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्या (ता. 29) भुदरगड तालुक्‍यातील गारगोटी येथे दुपारी चार वाजता शेतकरी मेळावा आहे. त्यांच्या दौऱ्यासाठी मौनी विद्यापीठाच्या मैदानावर हेलिपॅड तयार करण्यात आले आहे.

Web Title: kolhapur news chief minister tour management