आनुवंशिकतेतून बाल मधुमेहाची चिंता

शिवाजी यादव
गुरुवार, 24 मे 2018

कोल्हापूर - जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात वर्षाला तीनशे ते साडेतीनशे बालमधुमेही उपचारासाठी येत होते. हे चित्र पाच वर्षांपूर्वीचे आहे. मात्र गेल्या दोन वर्षांत हे प्रमाण जिल्ह्यात दीड हजाराच्या घरात गेले आहे. त्यामुळे बाल मधुमेहींची वाढती संख्याही गंभीर समस्या बनली आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सततचे उपचार, इन्सुलीन देऊन योग्य काळजी घेऊन नियंत्रणात ठेवू शकतो, असे बालरोग तज्ज्ञ डॉ. शिशिर मिरगुंडे यांनी सांगितले.

जगात पहिल्या तीन क्रमांकात मधुमेही भारतात आहेत. महाराष्ट्रात मधुमेही काही लाखांत आहेत. तरुणपणीच मधुमेह जडल्याचीही उदाहरणे आहेत. बदलती जीवनशैली, आहार-विहाराच्या मर्यादा आणि खाद्य संस्कृतीत येणारा कृत्रिमपणा, अशा अनेक कारणांसोबत आनुवंशिकता हेच प्रमुख कारण मधुमेहासाठी आहे. ज्यांचे वजन मर्यादेपेक्षा जास्त वाढते. त्याला मधुमेह होण्याचा धोका वाढतो. या बाबी प्रौढ व्यक्तींना लागू पडतात. तसेच त्यांच्याच पुढच्या पिढीत आनुवंशिकतेने मधुमेह येतो.  बालक जन्मानंतर लगेचच त्याची नैसर्गिक वाढ सुरू होते; पण काही बाळांचे वजन वाढत नाही.

प्रकृती कृश बनते किंवा मुलांना तहान मर्यादेपेक्षा जास्त लागते, धाप लागते. तेव्हा काही चाचण्या केल्यानंतर अशा बालकांना मधुमेह झाल्याचे लक्षात येते. काही वेळा हीच लक्षणे अन्य विकारात असू शकतात. त्यामुळे जेव्हा अशी लक्षणे दिसतात. तेव्हा वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे अपेक्षित असते.  गेल्या तीन वर्षांत सीपीआरमध्ये उपचारासाठी येणाऱ्या बालमधुमेहींची संख्या वाढली आहे. पूर्वी महिन्याला एक ते दोन रुग्ण येत होते. सध्या प्रमाण सहावर गेले आहे. याशिवाय काही जण थेट खासगी रुग्णालयातून उपचार घेतात. त्यांचे प्रमाण थोड्या फरकाने यापेक्षा दुप्पट आहे.

बालमधुमेहाची लक्षणे 

  •  दोन ते ७ वर्षांतील मुलांना लघवीला जास्त लागणे 
  •  धाप लागणे, वजन कमीच राहणे, प्रकृती वाढत नाही. 
  •  शरीरातील ॲसिडिक पदार्थांत वाढ होते. 
  •  काही वेळा मुलांची क्रयशक्ती कमी होते. 

घ्यावयाची काळजी 

  •  रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित राखणे 
  •  इन्सुलीन वेळीच घेणे 
  •  इन्डोप्रोनॉलॉजिस्ट यांचे मार्गदर्शन घेणे 
  •  इन्डोप्रोनॉलॉजिस्ट हॉर्मोन्स व थॉयरॉईड यांच्या 
  •    संतुलनासाठी निदान व उपचार करणे
Web Title: Kolhapur News childhood diabetes through genetics