चित्रपट महामंडळाच्या ‘त्या’ सेलिब्रेटी संचालकांना दणका

शिवाजी यादव
मंगळवार, 5 जून 2018

कोल्हापूर - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०१४ पूर्वीच्या संचालक मंडळाने गैरव्यवहार केल्याचा आरोप चित्रपट व्यावसायिक कृती समितीने केला होता. त्या संदर्भात सुरू असलेल्या न्यायिक दाव्यात तत्कालीन संचालक मंडळाला १० लाख ७६ हजार रुपये भरण्याचे आदेश दिले आहेत. या वृत्ताला अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या वरिष्ठ सूत्रांनी दुजोरा दिला. तत्कालीन संचालक मंडळातील सेलिब्रेटींनाही आदेशाचे पालन करावे लागणार आहे.

२०१४ पूर्वी जे संचालक होते त्यांच्या काळात पुण्यात चित्रपट कलावंतांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम घेतला. त्यासाठीच्या निधीत १३ लाखांची तूट आली होती. तत्कालीन संचालक प्रसाद सुर्वे यांच्याकडेच ही रक्कम असल्याचा आरोप झाला होता. यातील २ लाख १४ हजार रुपये सुर्वे यांनी आपल्याकडे दिल्याचे अभिनेत्री अलका कुबल यांनी सांगितले होते. प्रत्यक्षात ही रक्कम महामंडळाकडे जमा नव्हती. यामध्ये तत्कालीन संचालकांच्या व्यक्तिगत दाव्यांसाठीचा खर्च महामंडळाच्या निधीतून केला. लेखापरीक्षणातील अहवालासंदर्भातही आक्षेप घेतले आहेत.

भ्रष्टाचार उघडकीस आणणाऱ्यांचे सभासदत्व रद्द केले होते. असे आरोप अखिल भारतीय मराठी चित्रपट नाट्य कलावंत कृती समितीने केले होते. या संदर्भात कृती समितीने चित्रपट महामंडळासमोर उपोषणाचा इशाराही दिला होता. सर्वसाधारण सभेतही गदारोळ झाला. या प्रकरणावर एका न्यायीक संस्थेत सुनावणीही झाली. त्यानुसार आर्थिक अनियमितता असल्याचे निदर्शनास आले. त्यास अनुसरून १० लाख ७६ हजार रुपये  भरण्याचे आदेश झाले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

याबाबत तत्कालीन संचालकांची बाजू मिलिंद अष्टेकर यांना विचारली असता, याबाबतचे आदेश माझ्यापर्यंत आलेले नाहीत. त्यामुळे काही बोलू इच्छीत नाही, असे त्यांनी सांगितले. आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप करणाऱ्या कृती समितीचे सदस्य अर्जुन नलावडे यांनी रात्री फोन उचलला नाही.

पाटकर, कुबल यांचा समावेश
चित्रपट महामंडळाच्या इतिहासात प्रथमच सेलिब्रेटींवर आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप झाला. यात अभिनेते विजय पाटकर, प्रसाद सुर्वे, मिलिंद अष्टेकर, अभिनेत्री अलका कुबल, प्रिया बेर्डे, श्री. बिडकर यांच्यासह १४ संचालकांना भरपाई भरावी लागणार आहे.
 
Web Title: Kolhapur News Chitrapat Mahamandal fraud