वारसा जपण्यास कोल्हापूरकरांचा स्वयंस्फूर्त सहभाग

वारसा जपण्यास कोल्हापूरकरांचा स्वयंस्फूर्त सहभाग

जपूया मातीचा वारसा - रविवारी हजारो करवीरवासीय राबवणार स्वच्छता मोहीम
कोल्हापूर - सकाळ माध्यम समूह आणि कोल्हापूर महापालिकेच्या पुढाकाराने रविवारी (४ जून) होणाऱ्या ‘चला, जपूया मातीचा वारसा’ या मोहिमेत सहभागासाठी येथील विविध संस्था, संघटना, तरुण मंडळांसह महिला बचत गट पुढे सरसावले आहेत. मोहिमेत सहभागाची नोंदणी आजही अनेक संस्था व संघटनांनी ‘सकाळ’कडे केली. प्रातिनिधिक २४ वारसास्थळांची स्वच्छता या मोहिमेतून होणार असून भवानी मंडपात साडेनऊला मोहिमेची सांगता होईल. 

पर्यावरण दिनाचे औचित्य साधून गेल्या नऊ वर्षांत ‘सकाळ’ने ‘चला, रंकाळा वाचवूया’, ‘चला, झाडे लावूया’, ‘चला, पंचगंगा वाचवूया’ अशा विविध मोहिमा हाती घेतल्या आणि त्या यशस्वितेच्या एका विशिष्ट टप्प्यावर असताना आता ‘चला, जपूया मातीचा वारसा’ या मोहिमेला प्रारंभ होणार आहे. यंदाच्या पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच रविवारी (ता. ४) सकाळी सात ते नऊ या वेळेत ही मोहीम होईल. शहरातील २४ हून अधिक प्रेरणास्थळांची या वेळी स्वच्छता केली जाईल. चला, तर मग आपापल्या परीने आपणही स्वतःचे कर्तव्य बजावूया... आपल्या मातीचा वारसा जपूया...! 

येथे होईल स्वच्छता मोहीम 
महालक्ष्मी मंदिर ० भवानी मंडप ० विठ्ठल मंदिर ० केशवराव भोसले नाट्यगृह, 
खासबाग कुस्ती मैदान ० शिवाजी टेक्‍निकल ० धुण्याची चावी
सीपीआर ० सीपीआरसमोरील न्यायालयाची इमारत ० टाऊन हॉल ० साठमारी 
राधाकृष्ण मंदिर ० करवीर नगर वाचन मंदिर ० रंकाळा - संध्यामठ, रंकाळा टॉवर, 
शिवाजी विद्यापीठ ० कोटीतीर्थ तलाव ० राजाराम तलाव 
पंचगंगा घाट ० जैन मठ ० ताराबाई पार्कातील ऑल सेंटस्‌ चर्च परिसर 
मुस्लिम बोर्डिंग ० पाण्याचा खजिना ० बिंदू चौक ० बाबूजमाल दर्गा

स्वच्छता मोहिमेत काय करायचे...
हेरिटेज वास्तूच्या ठिकाणाची स्वच्छता 
वास्तूंवरील झाडे-झुडपे काढणे 
चिकटवलेले पोस्टर किंवा स्टिकर काढणे 
चुकीच्या पद्धतीने वास्तूवर लिहिलेली अक्षरे पुसणे 
(स्वच्छता मोहिमेची वेळ - सकाळी सात ते नऊ. स्वच्छतेनंतर साडेनऊपर्यंत भवानी मंडपात एकत्रित जमणे. तेथे सांगता समारंभ.) 

आम्ही सहभागी...
‘सकाळ’ने आवाहन केल्यानंतर कोल्हापूर बर्डस्‌ स्कूल, ऑल सेंट चर्चचे रेव्हरंड गोगटे, अवनि, व्हाईट आर्मी, आर्ट ऑफ लिव्हिंग, अरिहंत जैन फाऊंडेशन, हिंदू युवा प्रतिष्ठान, कलासाधना मंच, दळवीज्‌ आर्टस्‌ इन्स्टिट्यूट, कलानिकेतन महाविद्यालय, कलामंदिर महाविद्यालय, मंथन फाऊंडेशन, कोल्हापूर प्रायव्हेट क्‍लासेस टीचर्स असोसिएशन, रंकाळा मॉर्निंग वॉकर्स, रंकाळा संवर्धन व संरक्षण समिती, संध्यामठ तरुण मंडळ, राजे संभाजी तरुण मंडळ, प्रिन्सेस पद्माराजे पर्यावरण समिती, खंडोबा तालीम मंडळ, वाशी नाका मित्र मंडळ, क्रांती बॉईज, रंकाळा मार्केट मित्र मंडळ, जय भवानी मित्र मंडळ, सम्राट अशोक मित्र मंडळ, रंकाळा टॉवर प्रेमी मित्र मंडळ, वाय. जी. ग्रुप (अंबाई टॅंक), खंडोबा-वेताळ मर्दानी पथक, फिरंगाई तालीम मंडळ, अभिरुची कला, क्रीडा, सांस्कृतिक मंडळ (फुलेवाडी), लोकसेवा फाऊंडेशन, मुद्दाम तीन ग्रुप, जगदंब तरुण मंडळ, बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समिती, टाऊन हॉल मॉर्निंग वॉकर्स, टाऊन हॉल हास्य व योगा क्‍लब आदी संस्था, तालीम मंडळे आणि संघटनांनी सहभागाची नोंदणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com