प्लास्टिकमुक्त रायगडसाठी सरसावले हजारो हात

संदीप खांडेकर
मंगळवार, 5 जून 2018

रायगड - प्लास्टिकमुक्त रायगड करण्यासाठी हजारो हात आज सरसावले. चित्तदरवाजा ते भवानी टोक अशा सदतीस ठिकाणांची स्वच्छता बघता बघता करण्यात आली.

रायगड - प्लास्टिकमुक्त रायगड करण्यासाठी हजारो हात आज सरसावले. चित्तदरवाजा ते भवानी टोक अशा सदतीस ठिकाणांची स्वच्छता बघता बघता करण्यात आली. रायगड विकास प्राधिकरणतर्फे खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती व युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या संकल्पनेतून आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनानिमित्त ही मोहीम झाली. सकाळी सात वाजता मोहिमेस प्रारंभ झाला.

मेणा दरवाजा, हिरकणी बुरूज, टकमक टोक, होळीचा माळ, बाजारपेठ, महादरवाजा, कृषावर्त तलाव, शिवसमाधी, भवानी टोक, जगदीश्वर मंदिर, दारुखाना, हत्तीखाना, राजदरबार, बारा टाके आदी परिसरात स्वच्छता करण्यात आली. राज्यातील शिवभक्तांसह शिवाजी विद्यापीठ, मुंबई, सावित्रीबाई फुले पुणे व सोलापूर विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचा मोहिमेत सहभाग होता.

रायगडावर आज लाखो शिवप्रेमी उद्याच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी जमा झाले आहेत. आज या सर्व भक्तांनी रायगडावर स्वच्छता मोहिम राबवत प्लास्टिक मुक्तीच्या राष्ट्रीय चळवळीस या एेतिहासिक मोहिमेने हातभार लावला आहे. 

- संभाजीराजे छत्रपती, खासदार 

Web Title: Kolhapur News Cleanliness Movement on Raigad