नृसिंहवाडीत कृष्णा नदीत मगरीचे पिल्लू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

नृसिंहवाडी - येथील कृष्णा-पंचगंगा नदीच्या काठावर मगरीचे पिल्लू आढळल्याने भाविकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

नृसिंहवाडी - येथील कृष्णा-पंचगंगा नदीच्या काठावर मगरीचे पिल्लू आढळल्याने भाविकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

 सकाळी अकरा वाजता मगरीचे पिल्लू वन खात्याच्या ताब्यात देण्यात आले. आज सकाळी दत्त देव संस्थानच्या हद्दीतील कृष्णा-पंचगंगा नदीच्या काठावर अर्धा फूट लांबीचे मगरीचे पिल्लू नावाडी संजय गावडे, आफताब पटेल, दशरथ शिकलगार व कल्लाप्पा धिरडे यांना आढळले. अतिशय चपळ असलेले हे पिल्लू पाहण्यासाठी ग्रामस्थ व भाविकांनी गर्दी केली. वनरक्षक गजानन सकट व  देव कोळी यांनी मगरीचे पिल्लू ताब्यात घेतले. दत्त देव संस्थानचे अध्यक्ष विकास पुजारी यांनी नदीत स्नानासाठी भाविकांची गर्दी असल्याने वन विभागाने मगर असल्यास तिचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.

Web Title: Kolhapur News cocrodile in Krishan river