खेडमधील महाविद्यालयीन तरुण अपघातात ठार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर - आपटेनगर येथे सायंकाळी मोटारसायकल व टेंपोचा अपघात झाला. यात महाविद्यालयीन तरुण जागीच ठार झाला. धनंजय मोहन कुलकर्णी (वय २१, मूळ रा. शिवतर रोड, खेड, रत्नागिरी, सध्या रा. आपटेनगर परिसर) असे त्याचे नाव आहे. याबाबतची नोंद करण्याचे काम जुना राजवाडा पोलिस ठाण्यात सुरू होते. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, धनंजय हा मूळचा खेडचा आहे. काही वर्षापासून तो शिक्षणासाठी कोल्हापुरात आला होता. तो सध्या आपटेनगर परिसरात राहत होता. तो डी. डी. शिंदे सरकार महाविद्यालयात बीए भाग - ३ च्या वर्गात शिकत होता.

सहा महिन्यांपूर्वी त्याने मोटारसायकल खरेदी केली होती. आज सायंकाळी तो मोटारसायकलवरून शहरात येत होता. आपटेनगर-राधानगरी रस्त्यावर त्याच्या मोटारसायकलचा आणि टेंपोचा अपघात झाला. यात तो जागीच ठार झाला. याची माहिती नागरिकांनी जुना राजवाडा पोलिसांना दिली. सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल दराडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआरमध्ये पाठविला. धनंजयच्या खिशात सापडलेल्या ओळखपत्राच्या आधारे पोलिसांनी त्याच्या नातेवाइकांशी संपर्क साधून घडलेली घटना त्यांना सांगितली. 

Web Title: Kolhapur News college student dead in an accident