दिव्यांगांच्या साहित्यावरील "जीएसटी' रद्द करा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

कोल्हापूर -  दिव्यांगांना आवश्‍यक साधने "जीएसटी'तून वगळावीत, अशी मागणी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे आज निवेदनाद्वारे केली. 

कोल्हापूर -  दिव्यांगांना आवश्‍यक साधने "जीएसटी'तून वगळावीत, अशी मागणी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे आज निवेदनाद्वारे केली. 

निवेदनात म्हटले आहे की, सरकारने जाहीर केलेल्या जीएसटीमुळे अनेक वस्तू महाग झाल्या आहेत. यामध्ये दिव्यांगांना आवश्‍यक असणारे साहित्यही महाग झाले आहे. यापूर्वी या वस्तू व साधनांवर कोणत्याही प्रकारचा कर आकारला जात नव्हता. आता मात्र सरसकट 5 टक्के जीएसटी लागू केला आहे. दिव्यांगांना उपकरणे मिळवताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यातच हा कर आकारला जाणार असल्याने सरकार जीएसटी लावून अंधांची लाठी हिरावून घेत असल्याचे दिसून येते. विकलांग व्यक्तींचे अधिकार अधिनियम 2016 या कायद्याचे उल्लंघन जीएसटी परिषद करत आहे. देशातील 6 टक्के लोकसंख्या दिव्यांगांची आहे. त्यांना शून्य टक्के जीएसटी करून दिलासा द्यावा, अशी मागणी कॉंग्रेसचे कार्यकर्ते संजय पाटील, बजरंग रणदिवे, नारायण लोहार, आनंदा पाटील, शामराव पाटील, संजय काटकर, पार्थ काटकर, पार्थ जाधव, संदीप राऊत, मानसी तानवडे, गुलगर जंगले यांनी केली. 

Web Title: kolhapur news congress GST