महसूलमंत्री पाटील यांचा सोशल मीडियावर अवमान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

गारगोटी - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक मजकूर सोशल मीडियावरून पाठवणाऱ्या पडखंबे (ता. भुदरगड) येथील तिघांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल झाली.

गारगोटी - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक मजकूर सोशल मीडियावरून पाठवणाऱ्या पडखंबे (ता. भुदरगड) येथील तिघांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल झाली.

याप्रकरणी पोलिसांनी रमेश सुभाष पाटील, दत्तात्रय हरी गुरव, शिवाजी शामराव गुरव यांच्यावर कारवाई केली. याबाबत भाजप कार्यकर्ते रमेश शिवाजी रायजादे (रा. पडखंबे) यांनी तक्रार दिली.

पडखंबे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडीविरुद्ध शाहू आघाडी अशी लढत झाली होती. निवडणूक निकालानंतर मंत्री पाटील यांनी राष्ट्रवादीसोबत युती केल्यामुळे त्यांची मानहानी होईल, असा मजकूर सोशल मीडियावर पसरविला. तसेच रमेश रायजादे यांना मारण्याची धमकी दिली. माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल देसाई, तालुकाध्यक्ष नाथाजी पाटील, अलकेश कांदळकर, प्रा. हिंदूराव पाटील, संतोष पाटील आदींनी घटनेची गंभीर दखल घेत या तिघांवर गुन्हा दाखल करून तत्काळ अटक करावी, अशी मागणी जिल्हा पोलिस प्रमुखांकडे केली. यानंतर भुदरगड पोलिसांनी तिघांवर अटकेची कारवाई केली.

Web Title: Kolhapur News Contempt on social media