ठेकेदाराकडून तरुणावर अनैसर्गिक अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

इचलकरंजी - एकोणीस वर्षीय परप्रांतीय तरुणाला दारू पाजून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी ठेकेदारावर  गुन्हा दाखल झाला. हा प्रकार चार दिवसांपूर्वी रांगोळी (ता. हातकणंगले) येथील कंपनीच्या आवारामध्ये घडला आहे. गैरकृत्याची ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 

पीडित तरुणाच्या फिर्यादीवरून संशयित वालाराम लिच्छुराम जाट (मूळ रा. बोली, ता. सेडवा, जि. बाडमेर, राजस्थान) या ठेकेदाराविरोधी गुन्हा नोंद केला आहे. तो सध्या पसार झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक अनिल मोरे तपास करीत आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रांगोळी आणि सोलापूर येथील दोन कंपन्यांतील कामाचा ठेका आरोपी वालाराम जाट याने घेतला आहे. त्याने कामाकरिता परप्रांतीय तरुणांची भरती केली आहे. 

यातील एका तरुणाला दारू पिण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर त्याने तरुणावर अनैसर्गिक गैरकृत्य केले. त्याचबरोबर या गैरकृत्याचे त्याने स्वत:च्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केले. या गैरकृत्याच्या प्रकाराने भयभीत झालेल्या तरुणाने पोलिसांत तक्रार न देता तो आपल्या गावाकडे निघून गेला. 

याच दरम्यान आरोपी ठेकेदाराने केलेल्या अनैसर्गिक गैरकृत्यांची क्‍लिप व्हायरल केली. याप्रकरणी पीडित तरुणाने आज शिवाजीनगर पोलिसात धाव घेऊन आरोपी वालाराम जाट याच्या विरोधी फिर्याद दिली.

Web Title: Kolhapur News contractor Torture to youngster