जोतिबा डोंगरावर प्रदक्षिणा मार्गावर कुल कोट

निवास मोटे
गुरुवार, 22 मार्च 2018

जोतिबा डोंगर - श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथे चैत्र यात्रा तोंडावर आली आहे. या यात्रेत येणाऱ्या भाविकांच्या मंदिर परिसरातील काळ्या दगडी फरशीवर पायाला कडक उन्हामुळे चटके बसतात. हा त्रास कमी करण्यासाठी आता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने मुख्य मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा मार्गावर कुल कोट वापरण्यात आला आहे.

जोतिबा डोंगर मंदिर परिसरात संपूर्ण बेसाॅल्ट प्रकारातील काळा दगड असून त्यांच्यावर दगडी फरशी सर्वत्र बसविण्यात आल्या आहेत. या फरशा उन्हाच्या तीव्र तडाख्याने खूप तापतात. त्यावरून अनवाणी चालने भाविकांंना शक्य होत नाही. पायांना चटके बसतात. यातून फोडही उठतात. यासाठी कुल कोट (पांढरे पट्टे) प्रदक्षिणा मार्गावर वापरण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सचिव विजय पोवार, सदस्य शिवाजी जाधव, संगीता खाडे यांच्या पुढाकाराने हे काम पूर्ण झाले आहे. 

जोतिबा डोंगरावर दर्शन मंडप नसल्याने भाविकांना भर उन्हात दर्शन रांगेत उभे राहावे लागते. उन्हाच्या तीव्र तडाख्याने भाविकांना चक्कर येणे, रक्तदाब वाढणे या सारखे प्रकार सर्रास घडतात. त्यामुळे याठिकाणी दर्शन मंडप तातडीने होणे गरजेचे आहे, अशीही मागणी भाविकांकडून केली जात आहे. सध्या मात्र केवळ मंदिराच्या भोवती कुल कोट वापरण्यात आला आहे. या कोटाची चाचपणी शाहूवाडी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी आर. आर. पाटील, कोडोली पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या जोतिबा डोंगर कार्यालय ऑफिसचे  इनचार्ज महादेव दिन्डे, लक्ष्मण डबाणे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. 

Web Title: Kolhapur News Cool cote on prey way in Jotiba Temple