कोल्हापूर महापालिका पाणी उपसा केंद्रास पाटबंधारेने ठोकले टाळे

सचिन सावंत 
बुधवार, 7 मार्च 2018

कोल्हापूर - पाणी बिल थकवल्याच्या कारणावरून कोल्हापूर महापालिकेचा पाणी पुरवठा आज खंडित करण्यात आला. कोल्हापूर पाटबंधारे विभागाने ही कारवाई केली आहे.

कोल्हापूर - पाणी बिल थकवल्याच्या कारणावरून कोल्हापूर महापालिकेचा पाणी पुरवठा आज खंडित करण्यात आला. कोल्हापूर पाटबंधारे विभागाने ही कारवाई केली आहे. 21 कोटी 94 लाख रुपये इतकी थकबाकी आहे. यासाठी पाटबंधारे विभागाने पाणी उपसा केंद्रास आज टाळे ठोकले.

महापालिकेने 2011 पासून सुमारे 22 कोटी रुपये बिल थकवले आहे. पाच मार्चपर्यंत पालिकेला मुदत दिली होती. मात्र तरीही महापालिकेने बिल भरले नाही. त्यामुळे आज पाटबंधारे विभागाने पालिकेचा पाणीपुरवठा खंडित केला. पालिकेने थकबाकीदारांना नोटीस पाठवण्यास सुरुवात केली आहे. मात्र अजून त्यास म्हणावी तशी वसुली झाली नाही. त्यामुळे पालिका थकीत बिल भरून पाणी पुरवठा पूर्ववत करणार का हेच पाहावं लागणार आहे.

Web Title: Kolhapur News corporation water supply Disconnected