कोल्हापूर - कॉस्मेटीक प्रोडक्टस् आणि हर्बल आईलमध्ये नफा होऊ शकतो असे सांगून कच्चा माल तयार करणाऱ्या उत्पादकाची तब्बल 11 लाख 74 हजार 800 रुपयांची फसवणूक झाली आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून टप्प्याटप्प्याने इंटरनेट आणि मोबाइलद्वारे ही फसवणूक झाल्याची फिर्याद राजारामपुरीतील दिलीप बाबुराव दळवी यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात दिली आहे. शिलॉंग येथील कंपनीच्या संचालिका सौ. विजया जे.पी. यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी सांगितले, दळवी हे राजारामपुरी बारावी गल्लीतील शिवाजी हौसिंग सोसायटी येथे राहतात. तेथेच त्यांचा हर्बल ऑईल कॉस्मेटीक्स् प्रोडक्टस् आणि कंपन्यांना लागणारे रॉ मटेरीयल विक्री करण्याचा व्यवसाय आहे. 22 जूनपासून 30 नोव्हेंबर दरम्यान संशयित आरोपी संचालिका सौ. विजया जे. पी. (रा. हाऊस नं. 101, क्वीटन रोड, लयटुमकर, शिलॉंग ईस्ट, खासी हिल्स् मेसर्स जे. पी. केमिकल्स आणि हर्बल सोलुशन) यांनी फायद्यासाठी 11 लाख 200 रुपयांचा निव्वळ फायदा होऊ शकतो व भविष्यात सुद्धा व्यवसायात फायदा करून देऊ शकतो अशी बतावणी करून दळवी यांची 11 लाख 74 हजार 800 रुपयांची फसवणूक केली आहे. त्याबाबतची फिर्याद दळवी यांनी दिली असून संचालिका विजया जे. पी. यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.