कोल्हापूरः मोटार पलटून झालेल्या अपघातात दांपत्य ठार

file photo
file photo

कोल्हापूरः सूनेला सासरी आणण्यासाठी जात असलेल्या उत्तरेश्‍वर पेठेतील कुटुंबावर काळाने घाला घातला. टोप (ता. हातकणंगले) जवळ मोटार पलटल्याने झालेल्या अपघातात दांपत्य ठार झाले तर चालकासह तिघे जण जखमी झाले. अन्वर रमजान शेख (वय 55), आसिफा अन्वर शेख (वय 48, दोघे रा. गोंधळी गल्ली, शुक्रवार पेठ) अशी मयत दांपत्याचे नाव आहे. तिघा जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. येथे नातेवाईक व मित्रपरिवारांनी मोठी गर्दी केली होती.

जखमींची नांवे - रिजवाना सलीम शेख (वय 40), सौफिया युनूस नरगुंद शेख (वय 13), नईम सुलतान शेख (वय 30, तिघे रा. कागदी गल्ली, उत्तरेश्‍वर पेठ) अशी आहेत.

याबाबत नातेवाईकांकडून मिळालेली माहिती, अन्वर शेख व त्यांची पत्नी आसिफा हे दोघे मंगळवार पेठेतील सनगर गल्लीतील पतसंस्थेत पिग्मी एजंटसह लिपिकाचे काम करतात. त्यांचा थोरला मुलगा आसीम याचा विवाह झाला आहे. त्यांची सून बाळंतपणासाठी तीन महिन्यापूर्वी किणी घुणकी येथे माहेरी गेली होती. त्यांचा लहान मुलगा "अजीम' याचा 8 सप्टेंबरला विवाह आहे. तसेच दोन दिवसावर ईद चा सणही आला असल्याने त्यांनी सूनेला सासरी घेऊन येण्याचे ठरवले. आज (गुरुवार) सकाळी आकराच्या सुमारास ते मोटारीतून सूनेला आणण्यासाठी तिच्या किणी-घुणकी येथील माहेरी निघाले. त्यांच्या सोबत पत्नी आसिफा, नातेवाईक रिजवाना शेख, सुफीया शेख होते. मोटार नईम शेख चालवत होते. साडेआकराच्या सुमारास टोप जवळ मोटार आल्यानंतर त्यात काहीसा तांत्रिक बिघाड झाला. तसे चालकाचा ताबा सुटून मोटार पलटी झाली. त्यात हे पाचही जण जखमी झाले. त्यातील अन्वर व आसिफा शेखहे गंभीर जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी रुग्णवाहिकेतून त्या सर्व जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. उपचार सुरू असताना अन्वर व आसिफा शेख या दांपत्याचा मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, परिवहन समिती सभापती नियाज खान, नगरसेविका माधवी गंवडी, माजी नगरसेवक आदील फरास, प्रकाश गंवडी, किशोर घाटगे, राहूल बंदोडे यांनी सीपीआरमध्ये नातेवाईकांची भेट घेतली. जखमींची विचारपूस करून उपचाराबाबत डॉक्‍टरांशी चर्चा केली. जसजशी ही घटना समजेल तसे भागातील नागरिकही सीपीआरमध्ये दाखल झाले. त्यांनी आक्रोश करणाऱ्या नातेवाईकांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

शेख कुटुंबावर काळाचा घाला...
ईद सण अवघ्या दोन दिवसांवर आला होता. त्याचबरोबर मुलाचे लग्नही आठ दिवसावर येऊन ठेपले होते. त्याची तयारी शेख कुटुंबाकडून जोरात सुरू होती. सण व लग्न सोहळ्याला सूनेला घरी आणण्यासाठीच तिच्या माहेरी जात असताना काळाने शेख कुटुंबावर घाला घातला. याबाबत नातेवाईक व मित्रपरिवारांकडून हळहळ व्यक्त होत होती.

सीपीआरमधील डॉक्‍टरांची तत्परता ः
अपघातातील जखमी सीपीआरमध्ये आल्यानंतर त्यांच्यावर डॉक्‍टर आकाश तरकसे, सचिन शिंदे आणि अविनाश यांनी तातडीने उपचारास सुरवात केली. तिघा जखमींची प्रकृती स्थीर असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
येथे 'बाबा'चे समर्थक रस्त्यावर; इतर देशांत बलात्काऱ्यांचे काय होते पाहा

'स्वाभिमानी शेतकरी' सरकारमधून बाहेर; 'शेतकऱ्यासाठी पुन्हा रस्त्यावरची लढाई'
आणखी एक चांगला अधिकारी विदर्भात पळविला 
मुंबई: भेंडीबाजारमध्ये इमारत कोसळली; चौघांचा मृत्यू
पाचशे, हजाराच्या 99 टक्के नोटा बँकांमध्ये जमा 
मुंबईतील पावसात बेपत्ता झालेल्या डॉ. अमरापूरकरांचा सापडला मृतदेह
नांदूर मध्यमेश्वर अभयारण्यात पावसाळ्यातही किलबिलाट
कोयना धरणातील पाणीसाठा शंभर टीएमसीकडे
मानव विकास निर्देशांकामध्ये राज्यातील १२५ तालुके पिछाडीवर
ठाणेदारांनी केला महिला पीएसआयविरोधात गुन्हा दाखल
सुरवंटाचे फुलपाखरात रूपांतराची अनुभूती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com