ऑक्‍सिजन सिलिंडरचा पुरेसा साठा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

कोल्हापूर -  येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर), सावित्रीबाई फुले हॉस्पिटलसह काही रुग्णालयांतही ऑक्‍सिजन सिलिंडरचा पुरवठा व्यवस्थित होत आहे. विशेषतः सीपीआर रुग्णालयात रोज सुमारे 70 हून अधिक ऑक्‍सिजन सिलिंडर लागतात; पण पुरवठादार एजन्सीकडून ही जबाबदारी नीटपणे सांभाळली जात असल्याचे छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. महापालिकेच्या खासगी सावित्रीबाई फुले रुग्णालयात मात्र तस्सलमात घेऊन ऑक्‍सिजन सिलिंडर आणण्याची वेळ वैद्यकीय अधिकाऱ्यांवर येते. ऑक्‍सिजन पुरवठ्यासाठी खास निधीही नाही आणि ठेकेदार एजन्सीही नेमलेली नाही. 

रुग्णालयात ऑक्‍सिजन सिलिंडर नसल्याने उत्तर प्रदेश येथील गोरखपूरमध्ये अनेक लहान मुलांना आपले प्राण गमवावे लागले. सिलिंडर पुरवठादार करणाऱ्या ठेकेदाराचे बिलच थकल्याने हा महाभयंकर प्रसंग ओढवला. या पार्श्‍वभूमीवर सीपीआर रुग्णालय, सावित्रीबाई फुले हॉस्पिटलसह काही रुग्णालयातही सिलिंडरचा पुरवठा कसा होतो, हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय हे येथील जिल्हा रुग्णालय असून, ते 500 हून अधिक खाटांचे आहे. येथे अनेक दुर्धर आजारांवर उपचार केले जातात. त्यामुळे येथे ऑक्‍सिजन सिलिंडरची गरज असते. हा पुरवठा करण्याचे काम तीन कंपन्यांना दिले आहे. त्यांच्याकडून सिलिंडरचा पुरवठा होतो. रोज सुमारे 70 हून अधिक ऑक्‍सिजन सिलिंडर या रुग्णालयासाठी लागतात. 

सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्येही रुग्णांना अनेकदा ऑक्‍सिजन देण्याची वेळ येते. त्यासाठी रुग्णालयात ऑक्‍सिजन सिलिंडरची आवश्‍यकता असते. पण, यासाठी खास निधीची येथे व्यवस्था नाही. 20 ते 25 हजार रुपयांची तस्सलमात घेऊन येथे ऑक्‍सिजन सिलिंडर आणावा लागतो. गेले अनेक दिवस अशा प्रकारे सिलिंडर आणावे लागतात. अधिकारी स्वतःच्या नावावर तस्सलमात रक्कम घेऊन सिलिंडर आणून ठेवतात; पण यासाठी खास निधीची तरतूद करावी आणि ठेकेदार एजन्सीही नेमावी, अशी मागणी आता पुढे येत आहे.

Web Title: kolhapur news CPR hospital oxygen cylinders

टॅग्स