रंकाळा बसस्थानकातील रोकड चोरीचा तपास सुरू 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - रंकाळा बसस्थानकातून बॅगेतील रक्कम चोरीला गेल्याची तक्रार देण्यासाठी आलेल्या बंडू पाटील (वय 70) यांचा जुना राजवाडा पोलिस ठाण्यात हृदयविकाराने काल मृत्यू झाला. ही तक्रार जरी कागदोपत्री नोंद झाली नसली, तरी बॅग चोरणाऱ्या चोरट्याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. 

धुंदवडे (ता. गगनबावडा) येथील बंडू बाळकू पाटील काल सकाळी कोल्हापुरात कामानिमित्त आले होते. काम आटोपून दुपारी पुन्हा एस. टी. बसने गावी जात होते. रंकाळा स्थानकात बसमध्ये चढताना चोरट्याने त्यांच्या हातातील बॅग कापून त्यातील 67 हजार लंपास केले. हा प्रकार बसमध्ये बसल्यानंतर त्यांच्या लक्षात आला. भेदरलेल्या अवस्थेत पाटील त्यांचे मित्र अनिल पोतदार यांच्याकडे गेले. ते त्यांना घेऊन जुना राजवाडा पोलिस ठाण्यात आले. तेथे त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. 

रंकाळा स्थानकात चोरीचा गुन्हा दाखल झाला नसला, तरी जुना राजवाडा पोलिसांकडून याचा तपास सुरू झाला आहे. स्टॅंड व परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचे काम पोलिसांनी सुरू केले. रेकॉर्डवरील गुन्हेगारांचीही माहिती घेतली जात आहे. लवकरच चोरट्याला पकडू असा विश्‍वास पोलिस निरीक्षक निशिकांत भुजबळ यांनी व्यक्त केला. दरम्यान घडलेल्या कालच्या घटनेबाबत साक्षीदारांचे जवाब नोंदविण्याचेही काम सुरू केले आहे.

Web Title: kolhapur news crime