फाळकूटदादावर खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - दुकानात घुसून खंडणी मागितल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फाळकूटदादावर गुन्हा दाखल झाला. डेटॉल ऊर्फ दादू शिंदे (रा. राजारामपुरी) असे संशयिताचे नाव असल्याचे शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी सांगितले.

कोल्हापूर - दुकानात घुसून खंडणी मागितल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फाळकूटदादावर गुन्हा दाखल झाला. डेटॉल ऊर्फ दादू शिंदे (रा. राजारामपुरी) असे संशयिताचे नाव असल्याचे शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी सांगितले.

कळंबा येथील रितेश बजरंग शिंदे (वय ३०) यांचे राजारामपुरी पाचव्या गल्लीत फॅशन मेन्सवेअर नावाचे रेडीमेड दुकान आहे. या दुकानात काल रात्री नऊच्या सुमारास डेटॉल ऊर्फ दादू जबरदस्तीने घुसला. दुकानमालक रितेश यांनी त्याला ओळखले. त्यांनी त्याला बाहेर जाण्यास सांगितले; पण त्याने त्यांना दमदाटी केली.

 दुकानातील १० ते १२ शर्ट व पॅन्ट पाहिजे, तू आताच्या आता दे’ अशी मागणी केली; पण पैसे देऊन कपडे खरेदी कर, असे रितेश यांनी त्याला सांगितले. यावर त्याने ‘मी कोण आहे, तुला माहीत नाही का? मला ‘डेटॉल’ म्हणतात. माझ्याकडे पैसे मागतोस का? असे म्हणत त्याने कपडे विस्कटले.

सर्व दुकानदारांना बघून घेण्याची भाषा वापरत त्याने रितेश यांना जीवे मारण्याचीही धमकी देत निघून गेला. या प्रकारामुळे परिसरातील नागरिक जमा झाले. यानंतर रितेश शिंदे यांनी याची माहिती राजारामपुरी पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत रितेश शिंदे यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात आज फिर्याद दिली. त्यानुसार डेटॉलवर गुन्हा दाखल केला. त्याच्यावर यापूर्वीही खंडणीचा गुन्हा दाखल आहे. त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक संजय साळुंखे यांनी सांगितले.

Web Title: Kolhapur News crime news