‘राजारामपुरी’च्या हद्दीत पुन्हा अशांतता..

लुमाकांत नलवडे
सोमवार, 5 मार्च 2018

कोल्हापूर - राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार वर्षे शांतता होती. निरीक्षक बदलले आणि पुन्हा ही हद्द अशांत झाली. तेथील पोलिस  निरीक्षक रजेवर असल्याचे सांगण्यात येते. त्याचा कार्यभार सहायक पोलिस निरीक्षकांवर आहे. ‘ए’ ग्रेडचे हे पोलिस ठाणे असूनही तेथे सहायक पोलिस निरीक्षकांना जबाबदारी बजावावी लागते. येथील गुंडगिरी वाढणार नाही, यासाठी वेळीच लगाम घालण्याची आवश्‍यकता आहे.

जवाहरनगर, दौलतनगर परिसर, विक्रमनगर, राजेंद्रनगर, यादवनगर अशा काही ठिकाणी गुंडगिरी, मारामारी, अवैध धंदे जोरात असल्याच्या नोंदी पोलिस दफ्तरी आहेत. गॅंगवॉरसह खून, मारामाऱ्या या भागाला नव्या नव्हत्या. मात्र चार वर्षांपूर्वी राजारामपुरी ठाण्याचा ‘चार्ज’ अमृत देशमुख यांनी घेतला. आणि येथून पुढे पोलिस निरीक्षक काय असू शकतो, हे त्यांनी दाखवून दिले. राजेंद्रनगर तर सोडाच; पण राहुल चव्हाण ऊर्फ आर. सी. गॅंगही पाहता-पाहता शांत झाली. त्यांनी गुंडगिरी सोडाच; पण ‘नेतेगिरी’ करणाऱ्या अनेकांच्या मुसक्‍या आवळल्या.

राजेंद्रनगरात धुसफूस 
राजारामपुरी पोलिस ठाणे ‘ए’ ग्रेडचे असूनही आता सहायक पोलिस निरीक्षकांकडे चार्ज देण्यात आला. तेव्हापासून हद्दीत पुन्हा अशांतता आहे. दौलतनगर परिसरातील तीनबत्ती चौकात काल (ता. ३) नंग्या तलवारी भिरभिरल्या. राजेंद्रनगरात धुसफूस सुरू झाली. याला वेळीच आवर घातला नाही, तर पुढे होणाऱ्या परिणामांना पोलिस जबाबदार असणार काय?

शहरातीलच नव्हे, तर जिल्ह्यातील कोणत्याही पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला तर चालेल. मात्र राजारामपुरी ठाण्यात काही करायचे नाही, अशी धडकी गुंडांनाही भरली होती. राजारामपुरी ठाण्याच्या हद्दीत गुंडगिरी करण्याचे धाडस अनेकांत नव्हते. त्यांच्या ‘खाक्‍या’ला भले भले भीत. राजारामपुरी पोलिस ठाण्याची हद्द शांत होती.  

कालांतराने त्यांची बदली झाली. तेथे संजय साळुंखे यांनी पदभार घेतला. पुढे त्यांनी काही प्रमाणात वचक ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र ठाण्यात अंतर्गत ‘प्रकरणा’तून एका व्यक्तीची बदली पोलिस मुख्यालयात झाली; तर निरीक्षक साळुंखे रजेवर गेले. वरिष्ठांच्या अंतर्गत चर्चेतून राजारामपुरी पोलिस ठाण्याचा चार्ज सहायक पोलिस निरीक्षकांकडे देण्यात आला आहे.

Web Title: Kolhapur News Crime in Rajarampuri region