आजरा तालुक्यात आवंडीत हत्तीच्या कळपाचा धुडगुस 

रणजित कालेकर
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

आजरा - हत्तीच्या कळपाने आज आवंडी धनगरवाड्यावर धुडगुस घातला. धोंडीबा कोकरे, रोंगु कोकरे यांच्या मेसकाठ्या, कोंडीबा कोकरे यांच्या केळीच्या बागेचे नुकसान केले.

आजरा - हत्तीच्या कळपाने आज आवंडी धनगरवाड्यावर धुडगुस घातला. धोंडीबा कोकरे, रोंगु कोकरे यांच्या मेसकाठ्या, कोंडीबा कोकरे यांच्या केळीच्या बागेचे नुकसान केले. धोंडीबा कोकरे यांच्या दीडशे मेसकाठ्या हत्तीने उध्वस्त केल्या असून त्यांचे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले. पिकाचे नुकसान करून हा कळप परत चंदगडकडे जात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. 

कानूर मार्गे हत्तीचा कळप आवंडी परिसरात तीन दिवसापुर्वी दाखल झाला. कळपात चार हत्ती आहेत. त्यात नर-मादी व त्यांची  दोन पिल्ले आहेत. त्यांनी या परिसरातील मेसकाठी, केळीचे नुकसान केले. तीन दिवस हत्ती या परिसरात होते. धोंडीबा कोकरे यांच्या मेसकाठ्यांचे हत्तीने मोठे नुकसान केले. रोंगु केकरे यांच्याही मेसकाठ्या या कळपाने मोडल्या. कोंडीबा कोकरे यांची केळीची रोपे उध्वस्त केली. 

कळपाची दहशत 
चंदगड व आजरा सीमेवर असलेल्या गावांमध्ये कळपाची दहशत लागून राहिली आहे. हा कळप तालुक्‍याच्या सीमेवर वावरत असून तो कधी आजरा तर कधी चंदगड तालुक्‍यात उतरून पिकाची नुकसान करत आहे. 

Web Title: Kolhapur News crop damaged by Elephant in Ajra Taluka