अखेर दाजीपूर पर्यटकांसाठी खुले

अखेर दाजीपूर पर्यटकांसाठी खुले

राशिवडे बुद्रुक - पावसामुळे पाच महिने बंद असलेले आणी त्यानंतर आलेल्या तस्कर हत्तीमुळे आठवडाभर बंद राहिलेले दाजीपूर अभयारण्य पर्यटकांना खुले केले. 

सफरी सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी गवे, शेकरू, विविध पक्ष्यांचे पर्यटकांना दर्शन झाले. सध्या अभयारण्यात विविध रंगी ओर्किड्‌स फुललेली जागोजागी दिसतात. वन्यजीव विभाग, स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहकार्याने पर्यटक सफरीचा आनंद घेत आहेत. रोज सकाळी ७ ते दुपारी अडीच पर्यत पर्यटकांना प्रवेश मिळेल. प्रत्येक मंगळवारी अभयारण्य बंद राहील. अशी माहिती वन्यजीवचे सुनील सावंत यांनी दिली. राधानगरीमधील बायसन नेचर क्‍लबतर्फे जंगल सफारी सोबत देवराई दर्शन, ट्रेकिंग, जंगल कॅम्पची पण सोय पर्यटकांसाठी उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी www.radhanagari.in वर संपर्क साधावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com