साहित्य लेखनास अनुभवाची जोड महत्वाची - डॉ. गोपाळ गुरू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

कोल्हापूर - "" लिहिणाऱ्यांची संख्या वाढते आहे. त्याला अनुभवाची जोड लाभली तर सकस साहित्य निर्मितीला बळ लाभेल. त्यामुळे अनुभव सिध्द लेखन वाचकांच्या मनाचा ठाव घेईल.'' असे मत जेएनयु विद्यापीठाचे निवृत्त प्रा. डॉ. गोपाळ गुरू यांनी व्यक्त केले. 

कोल्हापूर - "" लिहिणाऱ्यांची संख्या वाढते आहे. त्याला अनुभवाची जोड लाभली तर सकस साहित्य निर्मितीला बळ लाभेल. त्यामुळे अनुभव सिध्द लेखन वाचकांच्या मनाचा ठाव घेईल.'' असे मत जेएनयु विद्यापीठाचे निवृत्त प्रा. डॉ. गोपाळ गुरू यांनी व्यक्त केले. 

येथील दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेतर्फे विविध पुरस्कारांचे वितरण झाले यावेळी ते बोलत होते. 

देण्यात आलेले पुरस्कार असे - 

  • धम्मपाल रत्नाकर राज्यस्तरीय काव्य पुरस्कार - अरूण इंगवले (आबूट घेऱ्यातला सुर्य), पी. विठ्ठल (शून्य एक मी)
  • दक्षिण महाराष्ट्र साहित्य पुरस्कार देवदत्त पाटील पुरस्कार - दत्ता मोरसे (झुंड)
  • आण्णा भाऊ साठे पुरस्कार - अशोक जाधव (भंगार)
  • कृ. गो. सुर्यवंशी पुरस्कार - श्रीकांत पाटील (लिहु आनंदे),
  • शंकर खंडू पाटील पुरस्कार - यशवंत माळी ( किराळ)
  • शैला सायनारकर पुरस्कार - सतिश सोळांकुरकर (रूजवात)
  • चैतन्य माने पुरस्कार - सुहास पंडित ( शब्द माझ सोबतीला)
  • बाल साहित्य पुरस्कार - रा. अ. गुरव (शाळेतल्या गोष्ठी) 

श्री गुरू म्हणाले की, ""शब्दाला भाषेत गुंफल तरच त्यातून अर्थस्पष्ट होऊन भावना कळतात. तिथे भाषेचे महत्व वाढते. अशा भाषेला सामाजिक विषय, तत्वज्ञान अनुभव यांची जोड लाभली तर सकस साहित्य निर्मिती घडते. त्यासाठी लेखक आणि समाज यांच्यात संवाद असावा. यासंवादाची सुरवात घरातून व्हावी, यात टिका असली तर त्याचेही स्वागत असावे टिकेतून सुधारण्याचा वाव मिळतो तेव्हा सकस साहित्य निर्मितीचे बळ लाभते.'' 

पोलिस प्रमुख संजय मोहिते म्हणाले की, ""मनोरंजनाची माध्यम वाढल्यामुळे वाचकांची संख्या कमी झाल्याची ओरड होते, मात्र परदेशात एकेका पुस्तकाच्या लाखाच्या प्रती खपतात. परदेशात मनोरंजनाची माध्यम व्यापक आहेत तरीही पुस्तक खपतात याचा अर्थ आपल्याकडील पुस्तकांतील मजकूरांचा दर्जावाढीसाठी प्रयत्न अपेक्षित आहे.'' 

डॉ. आनंद पाटील, विजय चोरमारे यांनी मनोगत व्यक्त केले. 

विशेष पुरस्कार विजेते असे -

नवनाथ गोरे, अर्जुन व्हटकर, रवींद्र गुरव, अनुराधा खांडेकर, डॉ. रूपा शहा, केशव हरले, बा. ना. धांडोरे, विश्‍वास पाटील, भिमराव कुंभार, रावसाहेब पुजारी, मोहन लोंढे, शिवाजी देसाई, डॉ. शरद गायकवाड, प्रतिक पाटील, सुभाष कोरे, गौतम पाटील, उर्मिला शहा, प्रल्हाद कुलकर्णी. 

Web Title: Kolhapur News DAMASA award distribution programm