चारू चांदणेला दुहेरी जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर : शाळकरी मुलगा दर्शन शहाचे खंडणीसाठी अपहरण करून खून केल्याप्रकरणी योगेश ऊर्फ चारू चांदणे याला जिल्हा न्यायाधिश एल. डी. बिले यांनी दुहेरी जन्मठेप आणि एक लाख पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष सरकारी वकील ऍड. उज्वल निकम यांनी त्याला मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी असा युक्तीवाद केला

कोल्हापूर : शाळकरी मुलगा दर्शन शहाचे खंडणीसाठी अपहरण करून खून केल्याप्रकरणी योगेश ऊर्फ चारू चांदणे याला जिल्हा न्यायाधिश एल. डी. बिले यांनी दुहेरी जन्मठेप आणि एक लाख पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष सरकारी वकील ऍड. उज्वल निकम यांनी त्याला मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी असा युक्तीवाद केला.

देवकर पाणंद परिसरातील शुश्रूषानगरात स्मिता शहा या आई सुलोचना आणि मुलगा दर्शन सोबत राहत होत्या. दर्शन इयत्ता चौथीच्या वर्गात शिकत होता. त्याचे 25 डिसेंबर 2012 ला अपहरण झाले. याबाबतची तक्रार जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दाखल झाली. याप्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक यशवंत केडगे, सहायक पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी केला. या गुन्ह्याचा त्यांनी छडा लावला. शहा यांच्या घरासमोर राहणाऱ्या योगेश ऊर्फ चारू चांदणेला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्याच्यावर दोषारोप पत्र व दोष निश्‍चिती करण्यात आली.

या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधिश एल. डी. बिले यांच्या न्यायालयात सुरू झाली. तब्बल 35 दिवस या खटल्याचे कामकाज चालले. सरकारपक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी सरकारची बाजू मांडली. बचावपक्षातर्फे ऍड. पिटर बारदेस्कर यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर काल न्यायाधिश बिले यांनी काल योगेश ऊर्फ चारू चांदणेला दोषी ठरवले.

Web Title: Kolhapur News Darshan Shan Murder case