दक्षिण भारत जैन सभेचे अधिवेशन १६ व १७ रोजी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

कोल्‍हापूर - दक्षिण भारत जैन सभेचे ९८ वे त्रैवार्षिक अधिवेशन १६ व १७ जून रोजी ब्रह्मनाथ  भवन, श्री क्षेत्र, स्तवनिधी (जि. बेळगावी) येथे आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा पुरस्कार देऊन अधिवेशनात गौरव केला जाणार आहे. उपाध्यक्ष रावसाहेब जि. पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

ते म्हणाले,‘‘उद्योगपती गोपाल जिनगौडा यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता उद्‌घाटन होईल. ॲड. धन्यकुमार गुंडे स्वागताध्यक्ष आहेत. सभेचे अध्यक्ष रावसाहेब आ. पाटील अध्यक्षस्थानी असतील. सकाळी १० वाजता जैन महिला परिषद अधिवेशन होईल. सकाळी ११.३० वाजता वीर महिला मंडळ मध्यवर्ती समितीचे अधिवेशन होईल. दुपारी दोन वाजता पदवीधर संघटनेचे अधिवेशन होईल. दुपारी चार वाजता वीरसेवा दल मध्यवर्ती समितीचे अधिवेशन होईल.’’

श्री. पाटील म्हणाले,‘‘दुसऱ्या दिवशी सकाळी वार्षिक सभा, तर दुपारी दोन वाजता पुरस्कार वितरण होईल. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील, ‘सकाळ(कोल्हापूर)’चे मुख्य बातमीदार सुधाकर काशीद यांच्यासह प्रा. शिवाजी पाटील, शिवाजीराव पाटोळे, धनपाल हाबळे, आदिनाथ कुरूंदवाडे, श्रीपाल बोगार, ज्येष्ठ पत्रकार अशोक घोरपडे, डॉ. जयकांता बडबडे, वीराचार्य अल्पसंख्याक संस्था, भरत गाट,  सविंद्र पाटील, सारिका खुरपे, आर्किटेक्‍ट प्रमोद चौगुले, चंद्रकांत मेहता यांना कर्नाटकातील मंत्री रमेश  जारकीहोळी यांच्या हस्ते पुरस्कार दिले जातील. खासदार राजू शेट्टी, प्रकाश हुक्केरी, आमदार शशिकला जोल्ले यांची प्रमुख उपस्थिती असेल.’’
मुख्य महामंत्री डॉ. अजित पाटील, खजिनदार संजय शेटे यावेळी उपस्थित होते.

Web Title: Kolhapur News Deccan Bharat Jain Sabha on 16, 17 in NIpani