फटाक्‍यांची ध्वनी तीव्रता १० टक्के घटली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - यंदा दिवाळीतील फटाक्‍यांची ध्वनी तीव्रता गत दोन वर्षांपेक्षा दहा टक्‍क्‍यांनी घटली. रहिवासी क्षेत्रात ध्वनीची तीव्रता कमी राहिली असून लक्ष्मीपूजनादिवशी व्यापारी क्षेत्रात ही तीव्रता मर्यादेपेक्षा किंचित वाढली असली, तरी मागील वर्षापेक्षा तीन ते पाच टक्के कमी राहिली.

शिवाजी विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र अधिविभागाने केलेल्या निरीक्षणात ध्वनीच्या तीव्रतेचे सर्वेक्षण केले. पर्यावरणशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. पी. डी. राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. ए. एस. जाधव, डॉ. पी. आर. भोसले, डॉ. संदीप मांगलेकर, चेतन भोसले, विकास हारेर, अविनाश माने यांनी सर्व्हे केला. 

Web Title: Kolhapur News decrease in sound pollution