पुढील वर्षी पदवी प्रमाणपत्र मराठी भाषेतही !

संदीप खांडेकर
सोमवार, 19 मार्च 2018

कोल्हापूर - मराठी भाषेच्या गौरवासाठी पुढील दीक्षान्त सोहळ्यापासून शिवाजी विद्यापीठातर्फे मराठी व इंग्रजी अशी द्विभाषिक पदवी प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना दिली जाणार आहेत. विद्यापीठाने त्याबाबतचा प्रस्ताव तयार केला असून, परीक्षा विभागाकडून तो मंजूर झाला आहे. विद्यापीठातील अधिकार मंडळांच्या मंजुरीनंतर तो कुलपती कार्यालयाकडे पाठविला जाईल.

कोल्हापूर - मराठी भाषेच्या गौरवासाठी पुढील दीक्षान्त सोहळ्यापासून शिवाजी विद्यापीठातर्फे मराठी व इंग्रजी अशी द्विभाषिक पदवी प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना दिली जाणार आहेत. विद्यापीठाने त्याबाबतचा प्रस्ताव तयार केला असून, परीक्षा विभागाकडून तो मंजूर झाला आहे. विद्यापीठातील अधिकार मंडळांच्या मंजुरीनंतर तो कुलपती कार्यालयाकडे पाठविला जाईल.

द्विभाषिक प्रमाणपत्रे देण्यासाठी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के व पर्यावरणशास्त्र अधिविभाग प्रमुख प्रा. डॉ. पी. डी. राऊत यांची समिती स्थापन केली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी व इंग्रजी भाषेतील तज्ज्ञांनी प्रमाणपत्रासाठीचा मसुदा तयार केला. परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडे तो सादर झाला असून, मंजूरही झाला आहे. राज्यात वीस राज्य विद्यापीठांपैकी अकरा विद्यापीठे अकृषक आहेत.

‘‘शिवाजी विद्यापीठ महाराष्ट्रातील नामांकित विद्यापीठ आहे. मराठी ही आपली राजभाषा असल्याने इंग्रजीसह मराठी भाषेत प्रमाणपत्र देण्याची विद्यापीठाची भूमिका स्वागतार्ह आहे.’’

- प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर, विवेकानंद महाविद्यालय 

कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचा अभ्यासक्रम तेथे शिकवला जातो. पैकी मुंबईतील श्रीमती नथीबाई दामोदर ठाकरसी, पुण्यातील सावित्रीबाई फुले, औरंगाबादचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा, नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात द्विभाषिक प्रमाणपत्रे दिली जातात. प्रमाणपत्रावर एका बाजूला इंग्रजी, तर त्याच्या शेजारी मराठीतील मजकूर असतो. 

कर्नाटकातील सर्व विद्यापीठांकडून कन्नड व इंग्रजी अशी द्विभाषिक पदवी प्रमाणपत्रे दिली जातात. शिवाजी विद्यापीठसुद्धा आता मराठी व इंग्रजीत प्रमाणपत्र तयार करण्याच्या तयारीत आहे. प्रमाणपत्रावर एका बाजूला इंग्रजी व दुसऱ्या बाजूला मराठीतील मजकूर असेल.
-डॉ. डी. ए. देसाई,
मराठी मसुदा समिती

इंग्रजी भाषा सर्वमान्य असल्याने देश-परदेशांत नोकरीच्या ठिकाणी प्रमाणपत्र उपयुक्‍त ठरावे, यासाठी विद्यापीठात ते इंग्रजी भाषेत छापले जाते. आता मराठी भाषिक प्रदेशात मातृभाषेचा गौरव व्हावा, या उद्देशाने ते मराठीतही छापले जाणार आहे. सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘मी १९७७-७८ मध्ये पदवी प्रमाणपत्र घेतले. ते इंग्रजी व मराठी अशा दोन्ही भाषांतील आहे. आजही फुले विद्यापीठात दोन्ही भाषा असलेले प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना दिले जाते.’’

राज्यातील एकूण विद्यापीठे अशी  
 जनरल - १०  ॲग्रिकल्चर सायन्स - ४  नॅशनल लॉ - ३
 टेक्‍निकल - १  ॲनिमल अँड फिशरी सायन्स - १
 संस्कृत - १  हेल्थ सायन्स - १  वूमेन - १  ओपन - १
 

Web Title: Kolhapur News Degree certificate also in Marathi Language