#KolhapurDengue ७७ घरांतील फ्रीजच्या ट्रेमध्ये डेंगीच्या अळ्या

#KolhapurDengue ७७ घरांतील फ्रीजच्या ट्रेमध्ये डेंगीच्या अळ्या

कोल्हापूर - घरोघरी असलेल्या फ्रीजच्या ट्रेमध्ये डेंगीच्या अळ्या आज आढळून आल्या. लक्षतीर्थ वसाहत, हडको कॉलनी, दुधाळी, चंद्रेश्‍वर, सदरबाजार, देवकर पाणंद, चंद्रेश्‍वर परिसर, मंगेशकरनगर, चिले कॉलनी, फिरंगाई परिसर, साळोखेनगर येथे आज युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. त्यात असे दिसून आले, की बॅरेलमध्ये जास्त दिवस साठवून ठेवलेले पाणी, फ्रीजच्या पाण्यात अळ्यांनी वास्तव्य केले होते.

डेंगी रुग्णांची संख्या दोनशेच्या घरात गेली. महापौर, तसेच आयुक्तांनी काही भागांत फिरस्ती केली. फ्रीजच्या ट्रेमधील पाण्यात इतक्‍या मोठ्या प्रमाणावर अळ्या साचून राहतात, हे पाहून घरमालकही आश्‍चर्यचकित झाले. डेंगीचा डास घाण पाण्यामुळे होतो, असा अनेकांचा गैरसमज आहे; मात्र साठलेले पाणी आणि फ्रीजच्या कंडेन्सरमध्ये अळ्यांचे साम्राज्य आढळून आले आहे. महापालिका कर्मचाऱ्यांनी फ्रीजची तपासणी केली. सरनाईक कॉलनीतही पूर्वी लोकांनी महापालिका कर्मचाऱ्यांना घरात येण्याची परवानगी दिली असती, तर डेंगीचा फैलाव झाला नसता, असे अधिकाऱ्यांचे मत आहे. शहरात नाहीत, इतके रुग्ण जवाहरनगर परिसरात आहेत.

७७ घरांत डेंगीच्या अळ्या
दिवसभर ८३० कुटुंबांचा सर्व्हे झाला. पैकी ७७ घरांत डेंगीच्या अळ्या आढळून आल्या. विविध अशा सहा ठिकाणांवरील खरमाती उचलली. चार डबकी बुजविली गेली. ज्या बांधकाम व्यावसायिकांच्या साईटवरील पाण्याच्या टाकीत अळ्या आढळल्या, त्यांना नोटिसा बजावण्याचे काम सुरू आहे. पवडी, आरोग्य विभागाची यंत्रणा कामाला लागली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com