कोल्हापूर शहरात डेंगीची साथ

डॅनियल काळे
गुरुवार, 24 मे 2018

कोल्हापूर - शहरातील जवाहरनगर, शाहूपुरी, आझाद गल्ली, गुजरी कॉर्नर यासह अन्य काही भागात डेंगीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने अनेक रुग्ण सरकारी व खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहेत. मे महिन्यात डेंगी रुग्णांचा आकडा वाढला आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाला खडबडून जागे व्हायची वेळ आली आहे.

कोल्हापूर - शहरातील जवाहरनगर, शाहूपुरी, आझाद गल्ली, गुजरी कॉर्नर यासह अन्य काही भागात डेंगीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने अनेक रुग्ण सरकारी व खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहेत. मे महिन्यात डेंगी रुग्णांचा आकडा वाढला आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाला खडबडून जागे व्हायची वेळ आली आहे.

नागरिकांनीही या साथीचा फैलाव रोखण्यासाठी डास उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करायला हवीत. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळायला हवा. मेमध्ये शहरात डेंगी आजाराचा मोठा फैलाव झाला.

डेंगी साथीवर एक नजर 
2018 मधील रुग्ण
जानेवारी     ३०
फेब्रुवारी     ९
मार्च     ५
एप्रिल    २४
मे            ३७

फणफणणारा ताप, खोकला अशी लक्षणे असणारे अनेक रुग्ण उपचार करून जात आहेत. दिवसेंदिवस ही संख्या वाढत आहे, पण महापालिकेच्या आरोग्य विभागाला अद्याप जाग आलेली नाही. दाट वस्तीअसलेल्या भागात साफसफाई आणि स्वछतेचे अनेक प्रश्‍न निर्माण झाल्याने डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात झाली आहे.

  • डेंगी आजार विषाणुमुळे होतो
  • डेंगीचा प्रसार एडीस इजिप्ती डासाच्या मादीमार्फत होतो.
  • डासाच्या पायावर पांढरे पट्टे असतात, त्याला टायगर मॉरक्‍युटो म्हणतात
  • डेंगी ताप ३ ते १० दिवस असतो.
  • आझाद गल्लीत १२ रुग्ण

डासाची उत्पत्ती होणारी ठिकाण
साठविलेले स्वछ पाणी (पाण्याची टाकी, रांजण, वॉटर कुलरमधील पाणी, भंगार वस्तू, नारळाच्या करवंट्या, टायर, डबे, रिकाम्या कुंड्या, बादल्या, पाण्याचे उघडे साठे)

डेंगी तापची लक्षणे
अचानक तीव्र ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी, सांधेदुखी, उलट्या होणे, दुसऱ्या दिवसापासून तीव्र डोकेदुखी, अशक्तपणा, भूक मंदावणे, तहान लागणे, घशाला कोरड पडणे.

रक्तस्त्रावयुक्त डेंगी ताप
*वरील लक्षणाशिवाय त्वचेखाली रक्तस्त्राव, नाकाकडून रक्तस्त्राव, रक्ताची उलटी, रक्तमिश्रित किंवा काळसर रंगाचे शौचास होणे, पोट दुखणे.

उपाययोजना
*डेंगी ताप असल्यास त्वरित डॉक्‍टरांना कळविणे
*धूर फवारणी करणे,
*पाणीसाठ्यात गप्पी मासे सोडणे
*परिसरात स्वच्छता राखणे
*कीटकनाशक फवारणे, मछरदाणी वापरणे
पाणीसाठे आठवड्यातून एकदा रिकामे ठेवून कोरडा दिवस पाळणे

जवाहरनगर, शास्त्रीनगर, बुद्धगार्डन परिसरात डेंगीचे रुग्ण जास्त आढळत आहेत. दररोज ४ ते ५ नवे पेशंट दाखल होतात; पण आरोग्य विभाग दखल घेत नाही. परिसरात स्वछता राखणे गरजेचे आहे. प्रशासनाने गांभीर्याने पाहावे 
- मुजीब महात,
रुग्णाचे नातेवाईक

डेंगीच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. काही रुग्ण डेंगीसदृश आजारांनी त्रस्त आहेत. लक्षणे दिसताच रुग्णावर उपचार आवश्‍यक आहे. तातडीने महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. आरोग्य विभागाच्या मदतीने डासोत्पती केंद्रे नष्ट करावीत 
-डॉ. रमेश जाधव,
वैद्यकीय अधिकारी, मनपा

 

Web Title: Kolhapur News Dengue in Kolhapur city