विविध मागण्यांसाठी कोल्हापूरात देवदासींचा मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

कोल्हापूर - येथे देवदासींनी विविध मागण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. देवदासींच्या  मागण्या मंजूर करा अन्यथा पालकमंत्र्यांच्या घरासमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.

देवदासींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

देवदासींच्या प्रमुख मागण्या अशा - 

  • संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान मिळावे 
  • देवदासी विधवा वयोवृध्द निराधारांच्या निवृत्ती वेतनात तीन हजार रुपये वाढ करावी
  • हयातीचे दाखले देण्याची अट रद्द करावी
  • घरकुलासाठी शासनाची जागा उपलब्ध करून द्यावी
Web Title: Kolhapur News Devdasi agitation