भावी खासदारही मीच - धनंजय महाडिक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीबाबत राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ काय बोलले, यावर मी काही भाष्य करणार नाही. ते पक्षात ज्येष्ठ आहेत, आमचे नेते आहेत; पण कोल्हापूरचा पुढचा खासदार मीच असेन. आता राष्ट्रवादीचा असावा की नसावा, हे त्यांनीच ठरवावे, असे सूचक वक्तव्य खासदार धनंजय महाडिक यांनी केले.

कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीबाबत राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ काय बोलले, यावर मी काही भाष्य करणार नाही. ते पक्षात ज्येष्ठ आहेत, आमचे नेते आहेत; पण कोल्हापूरचा पुढचा खासदार मीच असेन. आता राष्ट्रवादीचा असावा की नसावा, हे त्यांनीच ठरवावे, असे सूचक वक्तव्य खासदार धनंजय महाडिक यांनी केले.

२६ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या कृषी प्रदर्शनाची माहिती देण्यासाठी बोलवलेल्या पत्रकार बैठकीत श्री. महाडिक यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तरे दिली.

श्री. मुश्रीफ हे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख प्रा. संजय मंडलिक यांना खासदार करणार, असे म्हणतात. यावर तुमची प्रतिक्रिया काय? असे विचारल्यावर श्री. महाडिक म्हणाले, ‘‘श्री. मुश्रीफ पक्षात ज्येष्ठ आहेत, ते आमचे नेते आहेत. त्यांनी काय बोलावे हा त्यांचा प्रश्‍न आहे; परंतु मी त्यांच्या वक्तव्यावर भाष्य करणार नाही.’’

पुढचा खासदार कोणत्या पक्षाचा असेल? यावर ते म्हणाले, ‘‘मीच खासदार असणार. गेल्या निवडणुकीची पुनरावृत्ती होईल; पण या निवडणुकीला अजून वर्षभर अवकाश आहे. आताच काही बोलणे योग्य ठरणार नाही.’’

राष्ट्रवादीची उमेदवारी तुम्हालाच असेल का, यावर ते म्हणाले, ‘‘मीच पुढचा खासदार असेन. आता राष्ट्रवादीचा असावा की नसावा, हे त्यांनीच ठरवावे.’’ श्री. महाडिक यांनी भूमिका जाहीर करावी, असे श्री. मुश्रीफ यांनी म्हटले होते, याबाबत विचारले असता याची मला माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे १० फेब्रुवारीला कोल्हापुरात येत आहेत, त्यात राजकीय काय होईल का, याविषयी ते म्हणाले, ‘‘ते तुम्ही पवार यांनाच विचारा.’’ प्रदर्शनासाठी मेरी वेदर मैदान अपुरे पडते; पण शहरात आता शासनाच्या मालकीची मैदानेच नाहीत, त्यामुळे मेरी वेदरशिवाय पर्याय नाही, असे श्री. महाडिक यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.

दादांच्या वक्तव्यावर बोलणार नाही
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘जन्मावे तर कर्नाटकातच जन्मावे’ या बेळगाव जिल्ह्यात केलेल्या वक्तव्याबाबत मी भाष्य करणार नाही. आम्ही सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठीशी आहोत. माझी पत्नी अरुंधती महाडिक यांच्या उपस्थितीत महिला मेळावा झाला, असे श्री. महाडिक यांनी या वेळी सांगितले.

Web Title: Kolhapur News Dhananjay Mahadik comment