चेन्नई येथील स्‍पर्धेत ध्रुव मोहिते याचे यश

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - चेन्नई येथे झालेल्या ॲमिओ कप नॅशनल सलून कार रेसिंग स्पर्धेत कोल्हापूरच्या ध्रुव मोहिते याने तृतीय क्रमांक पटकावला. त्याने सलून कार रेसिंगमध्ये प्रथमच सहभाग घेऊन सर्वसाधारण गटातही तृतीय क्रमांक मिळविला.

स्पर्धेतील पहिली फेरी कोईमतूर, तर चौथी फेरी चेन्नईमध्ये झाली. या फेरीत ध्रुवने रेसिंगमधील कौशल्य पणाला लावत तृतीय क्रमांकावर झेप घेतली. त्याला मोहितेज रेसिंग ॲकॅडमीचे अध्यक्ष शिवाजीराव मोहिते व अभिषेक मोहिते यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: kolhapur news dhruv mohite