ग्रा.पं.च्या थेट निधीबाबत तक्रारीच

सुनील पाटील
सोमवार, 22 जानेवारी 2018

कोल्हापूर - केंद्र सरकारकडून ग्रामपंचायतींना दिल्या जाणाऱ्या थेट निधीचे योग्य नियोजन झाले पाहिजे. अनेक कामे ग्रामसभेच्या ठरावाने होत असताना, काही लोकांमुळे थेट निधीवर प्रश्‍न निर्माण केले जात आहेत. काम कमी आणि तक्रारी जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

कोल्हापूर - केंद्र सरकारकडून ग्रामपंचायतींना दिल्या जाणाऱ्या थेट निधीचे योग्य नियोजन झाले पाहिजे. अनेक कामे ग्रामसभेच्या ठरावाने होत असताना, काही लोकांमुळे थेट निधीवर प्रश्‍न निर्माण केले जात आहेत. काम कमी आणि तक्रारी जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

जिल्ह्यात १०३० ग्रामपंचायती आहेत. या निधीसाठी ग्रामपंचायतींनी आपली लोकसंख्या आणि गावच्या क्षेत्रफळानुसार राष्ट्रीयीकृत बॅंकांत खाते उघडले आहे. ‘आमचा गाव-आमचा विकास’ या योजनेनुसार हे काम सुरू आहे. २०२० पर्यंत हा निधी टप्प्या-टप्प्याने मिळणार आहे. वास्तविक लोकांना अपेक्षित आणि प्राधान्याने गावकारभार करता यावा, हा यामागचा हेतू आहे. परंतु, गावच्या राजकारणामुळे अनेक ठिकाणी लोकांना विकास साधण्याऐवजी स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्याची दुर्बुद्धी सूचत आहे. जिल्ह्यात २०१६-१७ ते २०१९-२०२० पर्यंत ५५७ कोटी ११ लाख १५ हजारांचा निधी वितरित केला जाणार आहे. आतापर्यंत १०६ कोटी ९२ लाखांचा निधी वितरित झाला. वितरित निधीपैकी अनेक ठिकाणी दर्जेदार व चांगली कामे झाली. मात्र, काही ठिकाणी केवळ राजकारणातून या निधीला ‘खो’ घालण्याचे काम सुरू आहे.

हातकणंगलेतील सर्वाधिक गावे
हातकणंगले तालुक्‍यातील सर्वाधिक ३५ गावांचा यात सहभाग आहे. करवीर तालुक्‍यातील ३० गावांना थेट निधी मिळत आहे. याशिवाय, आजरा तालुक्‍यातील २, भुदरगडमधील २, चंदगडमधील १, गडहिंग्लजमधील ८, कागल ८, पन्हाळा ९, शाहूवाडी १, राधानगरी ५ व शिरोळमधील २४ गावांचा समावेश आहे. हा निधी योग्य ठिकाणी वापरला जावा. ग्रामस्थांनाही या निधीच्या खर्चाबाबत मार्गदर्शन करता येते. पण, काहींच्या राजकारणामुळे थेट निधी वापराला गालबोट लागले आहे. निधी खर्च केला नाही म्हणून आणि एकाच ठिकाणी जास्त निधी खर्च झाला म्हणून अनेक तक्रारी येत आहेत.

Web Title: kolhapur news direct fund grampanchyat complaint