आपत्ती व्यवस्थापनाचे देणार धडे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 मे 2017

आव्हान २०१७ उपक्रम - १२५० विद्यार्थ्यांचा सहभाग; ‘रिझर्व्ह फोर्स’ कार्यरत होणार

कोल्हापूर - नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आपत्तींमध्ये व्यवस्थापन कसे करावे, याचे प्रशिक्षण सुमारे साडेबाराशे विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठात देण्यात येणार आहे. १ ते १० जून दरम्यान होत असलेल्या ‘आव्हान-२०१७’ या राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिरातून आपत्ती निवारणासाठी एक ‘रिझर्व्ह फोर्स’ तयार करण्याचा उद्देश आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून राष्ट्रीय सेवा योजनेतील प्रत्येकी ४० विद्यार्थी शिबिरात सहभागी होऊन आव्हानांना तोंड कसे द्यायचे, याचे धडे गिरवणार आहेत. 

भूकंप, वादळ, महापूर अशा नैसर्गिक आपत्तींत लोकांना काय करावे, हे सूचत नाही. लोक जखमी झाले असतील, तर त्यांच्यावर कोणते प्राथमिक उपचार करावेत, अथवा जनावरांची देखभाल कशी करावी, महापुरावेळी कोणती खबरदारी घ्यावी, याचे पुरेसे प्रशिक्षण त्यांना असत नाही. घरातील तरुण मुले व मुलींची स्थिती याहून वेगळी नसते. महाविद्यालयीन तरुणाईला तरी आपत्ती व्यवस्थापनाचे धडे मिळावेत, यासाठी ‘आव्हान’ उपक्रमांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे एनडीआरएफच्या प्रशिक्षकांतर्फे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

प्रशिक्षण शिबिरासाठी प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येकी ४० विद्यार्थी सहभाग घेणार आहेत. त्यात ३० विद्यार्थी व १० विद्यार्थिनींचा समावेश असेल. शिबिरात जमिनीवरील व पाण्यातील आपत्तींना तोंड कसे द्यायचे, याचे धडे विद्यापीठासह राजाराम तलाव परिसरात दिले जाणार आहेत. यातील महत्त्वाचा भाग म्हणजे गावातील जत्रा-यात्रा, लग्नसमारंभ, मिरवणुका यामध्ये अचानक आपत्ती घडल्यास त्या वेळी नेमकेपणाने काय करावे, यासह विवाह समारंभात विषबाधा झाल्यानंतर कोणते उपाय ताबडतोब करावेत, याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात हे विद्यार्थी आपत्ती व्यवस्थापनाची ‘रिझर्व्ह फोर्स’ म्हणून कार्यरत राहणार आहेत. 

राज्यपाल प्रमुख पाहुणे
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्या तयार करण्यात येत आहेत. शिबिरार्थींच्या निवासाची सोय विद्यापीठाच्या वसतिगृहात करण्यात येणार असून, शिबिराच्या उद्‌घाटनासाठी राज्यपाल तथा कुलपती सी. विद्यासागर राव यांना आमंत्रित करण्याची तयारी सुरू आहे.

Web Title: kolhapur news disaster management training