कोल्हापूर क्रीडा प्रबोधिनीतर्फे नैपुण्य चाचणी

संदीप खांडेकर
गुरुवार, 3 मे 2018

कोल्हापूर - जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे आयोजित क्रीडा प्रबोधिनी क्रीडा नैपुण्य चाचणीत २७६ मुला-मुलींनी सहभाग घेतला. छत्रपती शिवाजी स्टेडियमवर चाचणीचे आयोजन केले होते. जिल्ह्यातील बारा तालुक्यातील मुला-मुलींचा यात सहभाग होता.

कोल्हापूर - जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे आयोजित क्रीडा प्रबोधिनी क्रीडा नैपुण्य चाचणीत २७६ मुला-मुलींनी सहभाग घेतला. छत्रपती शिवाजी स्टेडियमवर चाचणीचे आयोजन केले होते. जिल्ह्यातील बारा तालुक्यातील मुला-मुलींचा यात सहभाग होता.

सकाळी साडेनऊ वाजता चाचणी प्रक्रियेस सुरुवात झाली. वजन, उंची, ३० मीटर धावणे, सहा बाय दहा मीटर शटल रन, उभी उडी लांब, मेडिसिन बाॅल थ्रो, ८०० मीटर धावणे प्रकारात मुला-मुलींनी कौशल्य पणाला लावले. प्रबोधिनीत प्रवेशासाठी २७ पैकी १७ गुणांची आवश्यकता असल्याने पालकांनी त्यांना प्रोत्साहित केले.  विभागीय क्रीडा संकुलातील मैदानावर आठशे मीटर धावणे प्रकार  सायंकाळच्या सत्रात घेण्यात आला.

माजी क्रीडा मार्गदर्शक सुभाष पवार, क्रीडा अधिकारी राजेंद्र घाडगे, राजेंद्र आतनूर, विकास माने, बालाजी बरबडे, प्रवीण कोंडावळे, एनआयएस कुस्ती प्रशिक्षक कृष्णात पाटील यांनी संयोजन केले.

पाटेकरवाडीतील सुदर्शन संभाजी पाटील याच्या वडिलांचे २३ एप्रिलला निधन झाले. वडिलांना तो  क्रीडा प्रबोधिनी किंवा आर्मीत भरती व्हावा, अशी इच्छा होती. त्यामुळे तोही चाचणीत सहभागी झाला. त्याला क्रीडा शिक्षक सागर पाटील त्याला घेऊन आले होते.

पुतण्या संस्कार बाळासाहेब चौगुले याने विक्रम कुराडे, राहुल आवारे यांच्याप्रमाणे उत्कृष्ट कुस्तीपटू व्हावे यासाठी, अशी आमची इच्छा आहे. त्यालाही कुस्तीची आवड आहे.
- रविंद्र राजाराम चौगुले  
(नंदगाव)

एकूण सहभागी असे
मुले - २१४
मुली - ६२

Web Title: Kolhapur News District sport Prabodhini test