एसटी वेतनवाढ प्रश्नी पोटनिवडणूक आचारसंहीता संपल्यानंतर निर्णय घेऊ - दिवाकर रावते

शिवाजी यादव
शुक्रवार, 4 मे 2018

आचारसंहिता संपताच वेतन वाढीबाबत योग्य ती घोषणा जरूर करू. भविष्यात एसटीची सेवा अधिक सक्षम व्हावी कामगार कर्मचाऱ्यांच्या जगण्याला गती यावी, असे महत्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत.'' असे अाश्‍वासन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिले. 

कोल्हापूर - एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटूंबाला अर्थिक विवंचना सोसाव्या लागतात याची जाणीव एसटी महामंडळाला आहे. पोटनिवडणूकीची आचारसंहिता असल्याने वेतनवाढीबाबत घोषणा करता येत नाही. पण आचारसंहिता संपताच वेतन वाढीबाबत योग्य ती घोषणा जरूर करू. भविष्यात एसटीची सेवा अधिक सक्षम व्हावी कामगार कर्मचाऱ्यांच्या जगण्याला गती यावी, असे महत्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत.'' असे अाश्‍वासन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिले. 

परिवहन मंत्री दिवाकर रावते कोल्हापूर दौऱ्यांवर आले असता त्यांनी एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयास भेट दिली यानंतर एसटी कर्मचाऱ्यांशी मध्यवर्ती बसस्थानकात संवाद साधला. कर्मचाऱ्यांनी वेतन वाढीपासून ते गाडीचे सुट्टे भाग अपुरे पडत असल्या पर्यंतच्या विविध कैफीयत त्यांच्या समोर व्यक्त केल्या. 

श्री. रावते म्हणाले की, "" एसटीचा कर्मचारी कोणत्याही संघटनेचा असो. तो प्रथम एसटीचा कर्मचारी आहे. त्यामुळे एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतो. मी मंत्री झाल्यानंतर किमान वेतन पध्दत सुरू केली. कनिष्ठ वेतन श्रेणी कालावधी कमी करून गेल्या कांही महिन्यात कनिष्ठ वेतन श्रेणी रद्द केली आहे. भविष्यात कर्मचारी हिताचे निर्णय घेणार आहोत. 

""घाबरू नका थांबा मी येतोय'

अनेकदा गाड्या बंद पडतात. त्या दुरूस्त करण्यासाठी कार्यशाळेत आणण्यात वेळ जातो, म्हणून 250 ब्रेक डाऊन दुरूस्ती गाड्या महामंडळाच्या सेवेत दाखल होणार आहेत. ""घाबरू नका थांबा मी येतोय' या शीर्षकाखाली या गाड्या जिथे एसटी बंद पडली असेल तेथे या गाड्या जातील बंद एसटीची जागेवर दुरस्ती करतील या गाड्यात तांत्रीक कर्मचारी पथक व तांत्रीक साधणे असतील.'' असेही श्री. रावते यांनी सांगितले. 

एसटी अधिकाऱ्यांच्या बैठकीत श्री. रावते म्हणाले की, "" एसटी महामंडळाच्या बसस्थानक परिसरात 20 मीटरच्या आता येऊन कांही खासगी एजंट प्रवासी घेऊन जातात अशांवर कारवाई करावी त्यासाठी परिवहन अधिकारी, वाहतुक पोलिस व एसटी अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे एकमेकांना मदत करण्याची भूमिका घ्यावी. सलग सुट्टीच्या काळात खासगी वाहतुकदारांकडून एसटी भाड्याच्या तुलनेत दाम दुपट्ट भाडे आकारून प्रवासी वाहतुक होते. अशांवर कारवाई करावी. त्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने ही दक्ष रहावे, अशा सुचना त्यांनी केल्या. 

मराठी उमेदवाराच्या विरोधात काँग्रेस, भाजप - रावते

कॉंग्रेस - भाजपची दखल महाराष्ट्रातील जनता घेईल. 
कर्नाटकातील विधानसभा निवडणूकीत सीमा भागातील उमेदवारांच्या विरोधात भाजप व कॉंग्रेसने उमेदवार दिले आहेत. सीमा भाग महाराष्ट्रात यावा तेथील मराठी भाषिकांवर कन्नडची सक्ती होते. त्याविरोधात आंदोलनकरून आम्ही तुरूंगवास भोगला अजूनही आम्ही लढत आहोत, असे असताना सीमा भागातील मराठी उमेदवारांच्या विरोधात कॉंग्रेस व भाजप उमेदवार उभे करते ही बाब खेदाची आहे त्याची दखल महाराष्ट्रातील जनता घेईल तर मराठी उमेदवारांना पाठींबा देण्याची भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेसने घेतली आहे त्याबद्दल राष्ट्रवादीचे अभिनंदन असेही रावते म्हणाले.

Web Title: Kolhapur News Divakar Rawate comment