राशिवडेत "नो डॉल्बी... नो मिरवणूक' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

राशिवडे बुद्रुक - कोणत्याही स्थितीत डॉल्बीला परवानगी दिली जाणार नाही, मिक्‍सर असेल तरीही कारवाई करणार हा मुद्दा पोलिसांनी लावून धरल्याने अखेर येथील युवकांनी "नो डॉल्बी... नो मिरवणूक' असा निर्धार केला. यामुळे येथील सार्वजनिक गणेश मंडळांची लक्षवेधी ठरणारी ही मिरवणूक साध्या पध्दतीने पार पडली. बाहेरून आलेली नृत्यपथके कार्यक्रमाविना परतली, अनेक मंडळांनी दिलेले पैसेही बुडाले. दरम्यान येथील गाव तळ्यात मूर्ती विसर्जीत न करण्याच्या ग्रामपंचायतीच्या आवाहनाला मंडळांकडून प्रतिसाद मिळाला. चाळीसवर मंडळांच्या मूर्ती डोंगरावरील खणीत विसर्जीत करण्यात आल्या. 

सरपंच सागर धुंदरेंच्या उपस्थितीत श्री. सुर्वे यांनी सर्वांची बैठक घेतली. मिरवणूकीची वेळ जवळ येईल तसं युवकांनी डॉल्बीला परवानगीचा हट्ट धरला. विभागाचे पोलिस उपाधीक्षक आर. आर. पाटील यांनी डॉल्बी लावतील त्यांच्यावर कारवाई होणारच, साध्या ध्वनिक्षेपकाला परवानही देऊ पण मिक्‍सर वापरला तरी कारवाई करू, असा पवित्रा घेतला. यानंतर सर्वच मंडळांनी डॉल्बी नसेल तर मिरवणूक रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि ग्रामपंचायतीतून काढता पाय घेतला. यापुढे अन्य कुठे डॉल्बी वाजला तर राधानगरी पोलिसांना जबाबदार धरून त्यांच्याविरोधातच कारवाई करू, असेही मत मांडले. सुमारे पाचशेवर युवक उपस्थित होते. सर्वांनी केलेल्या नियोजनाचे बेत रद्द केले आणि मिरवणूक न काढण्याचाच निर्णय घेतल्याचे सरपंच श्री. धुंदरे यांनी सांगितले. 

पोलिसांच्या कडक भूमिकेमुळे मंडळांनी उभा केलेले डॉल्बी तातडीने उतरले. त्यानंतर आपापल्या मंडळांचे गणपती साध्या व पारंपरीक वाद्यांच्या सहाय्याने नेऊन विसर्जीत केले. मिरवणूकीसाठी बाहेर गावाहून आलेल्या विविध विक्रेत्यांवरही निर्णयाचा परिणाम झाला. 

सौरभला मदत करा - उपअधीक्षक पाटील 
गाव मोठे आहे, गणेशोत्सवात खर्चही मोठा केला जातो हे ऐकून आहे. मात्र राशिवडेकरांचे नाव दिल्लीच नव्हे तर देशाबाहेर नेणारा पैलवान सौरभ पाटील मात्र उपेक्षित आहे. त्याला सर्व मंडळांनी मदत केल्यास गावाची किर्ती आणखी वाढेल. अजून वेळ गेलेली नाही हे सत्कर्म कराच. असे भावनिक आवाहन उपअधीक्षक श्री. पाटील यांनी मंडळांना केले. 

दहीहंडीला डॉल्बी कसा चालला 
आम्ही एकएक रुपया गोळा करून हा सण करतो आणि तुम्ही बंदी आणता. मग परवा कोल्हापूरात झालेल्या दही हंडीला लावलेला डॉल्बी का जप्त केला नाही, का तो दांडग्याचा म्हणून. सुमीत पाटील याच्या या सवालावर उपाधीक्षकही स्तब्ध झाले नि तो तेथील पोलिसांचा निर्णय आहे असे सांगून निभावून घेतले. 

Web Title: kolhapur news Dolby