'नवरात्रोत्सव, मोहरमही डॉल्बीमुक्त करा'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सव व मोहरमही डॉल्बीमुक्त झाला पाहिजे. त्यासाठी आवश्‍यक त्या प्रबोधनासह उपाययोजना करा. नावाची नव्हे तर कामाची डी. बी. पथके तयार करा, असे आदेश विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले. कोल्हापूर परिक्षेत्रातील पोलिस अधीक्षक व अपर पोलिस अधीक्षकांची आज विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयात बैठक घेण्यात आली. त्यात ते बोलत होते. 

नांगरे-पाटील म्हणाले, ""गणेशोत्सव डॉल्बीमुक्त करून कोल्हापूर परिक्षेत्राने एक नवा आदर्श घालून दिला आहे. हीच परंपरा कायम ठेवा. आगामी नवरात्रोत्सव व मोहरम सणही डॉल्बीमुक्तच झाला पाहिजे. त्यासाठी आवश्‍यक त्या मंडळांच्या बैठका घ्या. त्यांचे प्रबोधन आणि आवश्‍यक त्या ठिकाणी प्रबोधन करून डॉल्बीमुक्त उत्सव, सण साजरे करा. समाधानकारक काम नसल्याने डी. बी. पथके बदलण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांमार्फत सर्व पोलिस ठाण्यांना दिले आहेत. नुसती नावाची डी. बी. पथके नकोत तर ती कामाची गुन्हेगारीला आळा घालणारी असली पाहिजेत. त्यासाठी कार्यक्षम अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करा. कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करा. कोणत्याही परिस्थितीत क्राईम रेट कमी झाला पाहिजे. ग्रामपंचायत निवडणुकीत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, याची दक्षता घ्या. गावागावांत जाऊन बैठका घ्या. त्याच धर्तीवर गुंडांना हद्दपार करा. मटका, जुगार, हातभट्टी सारखे अवैध व्यवसाय तातडीने बंद करा. या वेळी पाचही जिल्ह्यांतील पोलिस अधीक्षक उपस्थित होते. 

Web Title: kolhapur news Dolby free vishwas Nangre-Patil