राजारामपुरीत "डॉल्बी' लावूच देणार नाही... 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - राजारामपुरीतील गणेशोत्सवाच्या आगमन मिरवणुकीत डॉल्बी लावूच देणार नाही, असा इशारा शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिला. शहरात जागोजागी ध्वनिमापक यंत्रांद्वारे साऊंड सिस्टीमची तपासणी करून जागेवरच कारवाई केली जाईल, तसेच बंदोबस्तासाठी पोलिसांसह एक हजार होमगार्डसही नेमले आहेत. 

राजारामपुरीत गणेशोत्सव आगमन मिरवणूक खास आकर्षण असते. येथे डॉल्बी लागला तर विसर्जन मिरवणुकीत लागतो असे जणू समीकरण बनले आहे. कोणत्याही स्थितीत राजारामपुरीत डॉल्बी लावू द्यायचा नाही, असा संकल्प पोलिसांनी केला आहे. त्यासाठी आवश्‍यक तयारी केली आहे. आगमन मिरवणुकीसाठी राज्य राखीव दलाच्या तुकडीसह इतर पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात केला जाईल. ध्वनिमापक यंत्रणेद्वारे प्रत्येक मंडळाची साऊंड सिस्टीम तपासली जाणार आहे. शहर परिसरात असे 52 ध्वनिमापक यंत्रे उपलब्ध केली आहेत. डॉल्बी लावण्याचा कोणी प्रयत्न केल्यास यंत्रणा जागेवर जप्त करून मंडळासह, ट्रॅक्‍टर, डॉल्बी मालक चालकावरही गुन्हे दाखल केले जातील. हीच कारवाई शहर व परिसरातही करण्याचे आदेश पोलिस अधिकाऱ्यांना दिले असल्याचे डॉ. अमृतकर यांनी सांगितले.

Web Title: kolhapur news Dolby rajarampuri