डॉल्बी सिस्टीम नकोच नको... 

डॉल्बी सिस्टीम नकोच नको... 

कोल्हापूर - डॉल्बी सिस्टीमबाबत आजपर्यंत अनेकवेळा प्रबोधन होऊनसुद्धा पोलिसांना आव्हान देत मंडळांकडून त्याचा वापर केला जातो. कायदे काय आहेत, त्यांच्या अंमलबजावणीचे काय होते, हे सर्व तांत्रिक असले; तरीही त्याचे दुष्परिणामही पाहणे आवश्‍यक आहे. गतवर्षीचा अनुभव पाहता 16 मंडळांवर ध्वनिप्रदूषण केल्याबद्दल पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. ही प्रक्रिया आता न्यायालयीन स्तरावर आहे. ध्वनिप्रदूषणामुळे नेमके काय होते, त्याचे परिणाम काय आहेत, सर्वसामान्यांना त्याचा त्रास काय होऊ शकतो, यावर आधारित रिपोर्ट... 

गणेश आगमनावेळी राजारामपुरी मुख्य मार्गावर साधारण पन्नासहून अधिक मंडळांकडून डॉल्बी सिस्टीमचा वापर होत असल्याचे दिसून आले. 2015 च्या आकडेवारीनुसार केवळ राजारामपुरीतील सुमारे 16 मंडळांतील 165 हून अधिक कार्यकर्त्यांवर डॉल्बी सिस्टीम वाजविल्याबद्दल कारवाई करण्यात आली. आज त्या कार्यकर्त्यांना नोकरी मिळविताना आणि पासपोर्ट मिळविताना अनेक कायद्याच्या बाबीतून मार्ग काढावा लागत आहे. डॉल्बी सिस्टीममुळे मुख्य मिरवणूक मार्गावरील भिंत पडली. यातील जखमीचा हालहाल होऊन मृत्यू झाला. त्यामुळे उत्सवातील आनंद द्विगुणित झाला पाहिजे; पण इतरांना त्रास होऊ नये, याचीही दक्षता घेतली पाहिजे. 

तज्ज्ञांची माहिती... 
डॉ. अजित लोकरे (सीपीआर) 

कानाचे तीन भाग असतात - बाह्य, मध्य आणि अंतर्कर्ण. बाह्य आणि मध्य यांच्यामध्ये कानाचा पडदा असतो. ध्वनिलहरी बाह्य कर्ण कानाच्या पडद्यामार्गे मध्यकर्णात येतात. मध्यकर्णात लहान तीन हाडांच्या साखळ्या असतात. त्यामार्गे हा आवाज अंतर्कर्णात येतो. अंतर्कर्णात हेअर सेल असतात, त्यांच्यामार्फत ऑडिटरी नर्व्हच्या माध्यमातून लहरी मेंदूकडे जातात. जेव्हा अगदी मोठा आवाज होतो, तेव्हा त्या अंतर्कर्णातील हेअरसेलमध्ये दोष निर्माण होऊन या ध्वनिलहरी मेंदूकडे पाठविल्या जात नाहीत. आवाजाबाबत विशेष म्हणजे 30 डेसिबल म्हणजे तोंटात पुटपुटणे, 60 म्हणजे नेहमीचे बोलणे, 90 म्हणजे ओरडणे, 120 म्हणजे कानासाठी अस्वस्थ आवाज, 130 म्हणजे कानात वेदनादायक आवाज होय. डॉल्बी आणि फटाक्‍यांच्या आवाजाने कानाला हानी पोहोचू शकते. 

असा होऊ शकतो परिणाम 
डॉल्बीचा आणि फटाक्‍यांच्या आवजाने श्रवणशक्तीला हानी पोहोचते, कानाचा पडदा फाटला जाऊ शकतो. पडद्याला छिद्र पडू शकते. मध्यकर्णाच्या हाडांच्या साखळीला इजा पोहोचू शकते. काही वेळा कानात आवाज (रिंगिंग साऊंड) येऊ शकतो.

डेसिबल किती वेळ आवाज क्षमता तास 
साधारणपणे 90 डेसिबलचा आवाज आपण आठ तास ऐकू शकतो; मात्र 115 डेसिबल आवाज केवळ 25 मिनिटेच ऐकू शकतो. 

डेसिबल वेळ 
90---------------------- 8 तास 
95 ---------4 तास 
100 --------2 तास 
105-----------1 तास 
110-30 मिनिटे 
115----25 मिनिटे 

सर्वसाधारण -- नेहमीचे आवाज मापन (डेसिबल) 
रेफ्रिजरेटर -- 45 
नेहमीचे बोलणे -- 60 
हेवी ट्रॅफिक --- 85 
मोटारसायकल ---- 95 
एमपी थ्री प्लेअर मोठा आवाज ---- 105 
सायरन ---- 120 
फटाके ---- 150 

बाह्य आवाजापासून कानाच्या संरक्षणाचे काही उपाय 
कापूस बोळे ---- 5 डेसिबलपर्यंत संरक्षण 
इअर प्लग ---- 15--30 डेसिबलपर्यंत 
इअर मफ --- 30-40 डेसिबल 
इअर प्लग आणि मफ --- 40 पेक्षा जादा डेसिबलसाठी 

विभाग - दिवसा ः रात्री दहा ते सकाळी 
सहा औद्योगिक वसाहती - (75 डेसिबल) ः (70 डेसिबल) 
कमर्शिअल - 65 ः 55 
रेसिडेन्शिअल - 55 ः 45 
सायलेंट झोन - 50 ः 40 - 

ठळक 
गणेश विसर्जन मिरवणुकीतील मंडळांची संख्या 
2015 मध्ये 380 मंडळे 
2016 मध्ये 330 मंडळे 
2017 मध्ये साधारण 350 असण्याची शक्‍यता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com