कामटेचे तपास संशयाच्या भोवऱ्यात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर - चोरीच्या प्रकरणातील संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या तरुणाचा पोलिस कोठडीत खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावून पोलिसांची मान शरमेने झुकवणाऱ्या युवराज कामटेने याआधी केलेले तपास आता संशयाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्‍यता आहे.

कोल्हापूर - चोरीच्या प्रकरणातील संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या तरुणाचा पोलिस कोठडीत खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावून पोलिसांची मान शरमेने झुकवणाऱ्या युवराज कामटेने याआधी केलेले तपास आता संशयाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्‍यता आहे.

‘माल प्रॅक्‍टिस’ डोळ्यांसमोर ठेवून तो तपासाला हात घालायचा, असे आता उघडपणे बोलले जाऊ लागले आहे. तोडपाणी करण्यात वाक्‌बगार असलेल्या कामटेच्या या भानगडींच्या फायली पुन्हा ओपन होणार का, याकडे आता लक्ष असेल. त्यात काही अतिशय गंभीर प्रकरणांचा समावेश आहे. त्याविषयीची कुजबुज सुरू झाली आहे. अधिकृतपणे तक्रारी पुढे येतील, असेही काहींनी स्पष्ट केले आहे.  

कामटेचे सर्वच तपास संशयाच्या भोवऱ्यात आहेत. त्याच्याकडील प्रलंबित अर्जांची संख्या बरीच आहे. त्यामुळे कामटेने तपासात केलेली घाण शहर पोलिस ठाण्यातील इतर अधिकाऱ्यांना काढावी लागणार आहे. प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक म्हणून शहर पोलिस ठाण्यात नियुक्ती झाल्यानंतर प्रशिक्षण पूर्ण होण्यापूर्वी त्याने अवैध धंदेवाल्यांशी संधान साधले. त्याच्या तडजोडीचे आकडे पाहून ‘एलसीबी’चे तत्कालीन अधिकारी आश्‍चर्यचकीत झाले. ज्या गुन्ह्यात तडजोडी करायला वाव आहे, अशाच गुन्ह्याचा तपास कामटेकडे यायचा. घरफोडी, चोरीचे गुन्हे ‘डिटेक्‍शन’ केल्याचा आव आणून कामटे चमकोगिरी करताना त्यामागील ‘कलेक्‍शन’ नजरेसमोर आलेच नाही. पैसे देणाऱ्या, घेणाऱ्याचा फायदाच असल्याने तक्रारीचा प्रश्‍नच नव्हता.

गुन्हेगारांना पकडून त्यांच्याकडून गुन्हा कबुल केल्यानंतर कामटेचे पुढचे काम सोपे जायचे. घरफोडी, चोरीतील मुद्देमाल जप्त केल्यानंतर चोरट्यांकडून पुढील तपास केला जात नव्हता. चोरट्याकडील माहितीचा उपयोग ‘कलेक्‍शन’साठी केला जात होता. कलेक्‍शन गोळा करताना अनेकजण त्यामध्ये भरडले जात होते. 

मारामारी, दुखापतींच्या गुन्ह्यांचे तपासही कामटेकडे दिले जायचे. त्यातही तडजोडीशिवाय कामटेने खोलवर तपास केला नसल्याचे आता समोर येतेय. चौकशी अर्जही कामटेकडे प्रलंबित आहेत. शहर पोलिसांत नियुक्त झाल्यापासून बराच काळ गुन्हे प्रकटीकरण (डीबी)मध्ये कार्यरत असलेल्या कामटेने तीन वर्षांत मोठे घबाड मिळवल्याची चर्चा आहे.

‘मिंच्या’ ते अनिकेत...
गुंड मिंच्या गवळीचा दीड वर्षांपूर्वी वर्चस्ववादातून साथीदारांनी खून केला. मिंच्याचे अपहरण करून डोक्‍यात गोळी घातली. कवठेपिरानजवळ मृतदेह जाळून टाकला. संशयित आरोपी कामटेच्या मदतीने हजर झाल्याची चर्चा रंगली. त्याची चौकशी झाली नाही. अनिकेत कोथळेच्या खुनानंतर त्याचा मृतदेह जाळून टाकण्याचा प्रकार मिंच्या गवळी हत्यांकाडासारखाच आहे. 

Web Title: Kolhapur News doughtful invistgation of Kamathe