विनाअडथळा दर्शनासाठी अंबाबाई गणमाता कायदा करा -   डॉ. भारत पाटणकर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

कोल्हापूर -  "अंबाबाई ही आद्य गणमाता आहे, तिच्या पूजेसाठी कोणत्याही मध्यस्थांची गरज नाही. मातेचे विनाअडथळा दर्शन व्हावे, यासाठी अंबाबाई गणमाता कायदा करावा, यासाठी जनआंदोलन करणार असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे ज्येष्ठ नेते डॉ. भारत पाटणकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

कोल्हापूर -  "अंबाबाई ही आद्य गणमाता आहे, तिच्या पूजेसाठी कोणत्याही मध्यस्थांची गरज नाही. मातेचे विनाअडथळा दर्शन व्हावे, यासाठी अंबाबाई गणमाता कायदा करावा, यासाठी जनआंदोलन करणार असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे ज्येष्ठ नेते डॉ. भारत पाटणकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रविवारी (ता. 21) येथे शाहू स्मारक भवन येथे समविचारी व्यक्तींची राज्यव्यापी बैठक होत असल्याचे त्यांनी सांगितले. सकाळी दहा वाजता बैठकीस सुरवात होईल. 

डॉ. पाटणकर म्हणाले, ""अंबाबाई ही आद्य कुलस्वामिनींपैकी एक आद्य गणमाता आहे. दहा हजार वर्षांपूर्वी मातृप्रधान लोकशाही आणि गणसंध व्यवस्थांच्या काळातील या कुलस्वामिनी आहेत. या मातांची स्मारके आणि मंदिरे कुठल्या एका जातीची मक्तेदारी होऊ शकत नाही. त्याकाळी वेदांचा जन्मही झाला नव्हता. त्याकाळी ही व्यवस्था आस्तित्वात आली. पंढरपूरच्या विठोबा-रखुमाई मंदिरातील व्यवस्था बडवे, उत्पादकांकडून काढून सरकारने स्थापन केलेल्या समितीने नेमलेल्या व्यक्तींमार्फत पूजा होते. त्याच धर्तीवर अंबाबाई मंदिरात व्यवस्था व्हावी. पंढरपूरप्रमाणेच मातेचे दर्शन विनाअडथळा व्हावे. यासाठी रविवारच्या बैठकीत व्यापक चर्चा होईल. त्यातून आंदोलनाची दिशा निश्‍चित होईल, जोपर्यंत कायदा अस्तित्वात येत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही.'' 

लोकशाहीची पहिली परंपरा जिवंत राहणे गरजेचे आहे. पूर्वी गणमाता समान पद्धतीने वाटप करत होती तीच पद्धत सुरू व्हावी. मंदिराचे उत्पन्न हे मंदिराच्या ताब्यात राहावे, त्यातून विकास व्हावा, हाच यामागील उद्देश आहे. रविवारच्या बैठकीसाठी राज्यभरातून विविध लोक सहभागी होतील. तेथेच आंदोलनाची दिशा निश्‍चित होईल.

- डाॅ. भारत पाटणकर

या वेळी सुभाष देसाई, संपत देसाई, जयश्री चव्हाण, प्रा. टी. एस. पाटील, गेल ऍम्वेट आदी उपस्थित होते. 

Web Title: Kolhapur news Dr Bharat Patankar Press