ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. भीमराव गस्ती यांचे निधन

Dr. Bhimrao Gasti
Dr. Bhimrao Gasti

कोल्हापूर : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक डॉ. भीमराव गस्ती यांचे आज (मंगळवार) पहाटे कोल्हापूर येथे निधन झाले. ते 67 वर्षांचे होते.

गस्ती यांनी देवदासी प्रथा नष्ट व्हावी, यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. देवदासी महिलांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आणि बेरड-रामोशी समाजाच्या विकासासाठी 'उत्थान' ही सामाजिक संस्था त्यांनी बेळगावमधील यमुनापूर येथे सुरू केली. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यांमध्ये त्यांच्या कामाचा विस्तार होता. 

बेरड (आत्मकथन) आणि आक्रोश या त्यांच्या पुस्तकांना अनेक पुरस्कार मिळाले. सांजवारा हे त्यांचे पुस्तकही प्रसिद्ध आहे. पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी आणि स्व-रूपवर्धिनी या संस्थांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान या संस्थेचे ते अनेक वर्षे उपाध्यक्ष होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com