बोली, भाषा, संस्कृतीचे संवर्धन काळाची गरज - डॉ. गणेश देवी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

कोल्हापूर - जगभरात हजारो भाषा आहेत. एकट्या आफ्रिकेत दोन हजार सहाशे, तर भारतात आठशे भाषा आहेत. जगातील चार हजार भाषांपैकी निम्म्याहून अधिक भाषा येत्या पन्नास वर्षांत नष्ट होण्याची भीती आहे. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर बोली, भाषा व संस्कृतीचे जतन व संवर्धन काळाची गरज असल्याचे मत ज्येष्ठ भाषा व संस्कृती अभ्यासक डॉ. गणेश देवी यांनी व्यक्त केले. 

शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ आणि महावीर महाविद्यालय आयोजित ‘आपली भाषा, आपली संस्कृती’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ॲड. के. ए. कापसे होते. 

डॉ. देवी म्हणाले, ‘‘बहुविधतेने नटलेल्या देशातील प्रत्येक राज्यात सातशे ते आठशे बोलीभाषा आहेत. राज्यातील अशा भाषा संवर्धनासाठी किंबहुना मराठी भाषक व अभ्यासकांचे नेतृत्व करण्यासाठी शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाने पुढाकार घ्यावा.’’

डॉ. रफीक सूरज, डॉ. विनोद राठोड, डॉ. नीला जोशी, डॉ. मोहन लोंढे, डॉ. अनंता कस्तुरे, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. प्रमोद मुनघाटे, प्रसाद कुमठेकर आदींनी मार्गदर्शन केले. 

प्राचार्य डॉ. राजेंद्र लोखंडे यांनी स्वागत केले. डॉ. शिवकुमार सोनाळकर यांनी शिक्षक संघाच्या दशकपूर्तीच्या निमित्ताने वाटचालीचा आढावा घेतला. डॉ. डी. ए. देसाई, डॉ. प्रकाश डुकळे, डॉ. गोपाळ गावडे, डॉ. शरद गायकवाड, प्रा. जयवंत दळवी, डॉ. संजय पाटील, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. गोमटेश्‍वर पाटील यांनी संयोजन केले. डॉ. सुनीता लेंगडे, प्रा. राजा माळगी, चंद्रकांत पोतदार यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Kolhapur News Dr Ganesh Devi comment