"केमिकल' सर्वसमावेशक इंडस्ट्री - डॉ. जी. डी. यादव

संभाजी गंडमाळे
रविवार, 10 जून 2018

कोल्हापूर - केमिकल ही सर्वसमावेशक इंडस्ट्री असून सर्व विद्याशाखांना सामावून घेते. या इंडस्ट्रीच्या देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात पंधरा टक्के वाटा असून करियरच्या हजारो संधी रोज निर्माण होतात. आपल्या आवडीची संधी शोधा आणि तिचं सोनं करा, असा मौलिक मंत्र रसायन तंत्रज्ञान संस्था-"आयसीटी'चे कुलगुरू पद्मश्री डॉ. जी. डी. यादव यांनी दिला. 

"सकाळ' विद्या आणि डी. वाय. पाटील अभियांत्रिकी कॉलेजच्या वतीने आज झालेल्या सेमीनारमध्ये डॉ. यादव यांनी विद्यार्थी व पालकांशी संवाद साधला. "इंजिनिअरिंगच्या नव्या वाटा आणि केमिकल इंजिनिअरिंगचे महत्त्व' या विषयावर त्यांनी विस्तृत विवेचन केले. दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवनात झालेल्या या सेमीनारला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

इंजीनीअरींग म्हणजे काय, केमिकल इंजीनीअरींगमधील विविध प्रवाह, सद्याच्या आणि भविष्यातील करियरच्या संधी अशा विविध अंगांनी डॉ. यादव यांनी संवाद खुलवला. ते म्हणाले, ""इंजीनीअरींग हे क्रिएटीव्ह प्रोफेशन असून चेंज, चॅलेंज आणि करियर या त्रिसुत्रीवर आधारित आहे. रोज येथे नव्याने करियरच्या अनेक संधी निर्माण होतात. मात्र, ज्याचे गणित पक्के आहे, त्यानेच या क्षेत्रात यावे. त्याशिवाय इंग्रजीवर प्रभुत्व असायलाच हवे. कारण या क्षेत्रात लेखन कौशल्य फार महत्वाचे असते. कोणताही इंजिनिअर हा समाजाचे प्रश्‍न सोडवणारा असतो. साहजिकच त्याला जगभर मागणी असते. केमिकल इंजिनिअरला अमेरिकेत महिन्याला किमान सत्तर हजार डॉलरच्या जॉबची आजही संधी आहे.'' 

"सकाळ'चे निवासी संपादक डॉ. श्रीरंग गायकवाड यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. केमिकल विभागप्रमुख डॉ. के. टी. जाधव यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. ए. एन. जाधव यांनी कॉलेजमधील विविध अभ्यासक्रम आणि संधींची माहिती दिली. प्रा. अमरसिंह जाधव यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सुखदा आठले यांनी सूत्रसंचालन केले. 
 
Web Title: Kolhapur News Dr J D Yadav comment